ETV Bharat / city

धक्कादायक! तीन महिन्यात मुंबईत 282 अल्पवयीन मुलींचे अपहरण - अल्पवयीन मुलींचे अपहरण

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. जवळपास 1 कोटी 25 लाखांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात गेल्या तीन महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

mumbai police
मुंबई पोलीस
author img

By

Published : Apr 16, 2021, 7:12 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. जवळपास 1 कोटी 25 लाखांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात गेल्या तीन महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. याबरोबरच अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे गुन्हे सुद्धा वाढल्याचं मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते. मुंबई शहरात जानेवारी 2021 ते मार्च 2021 यादरम्यान चोरी, खून, दरोडा, बलात्कार, विनयभंग, अपहरण सारख्या घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेणारी ही विशेष बातमी.

तीन महिन्यात 282 अल्पवयीन मुलींचे अपहरण

गेल्या तीन महिन्यातील घडलेल्या गुन्ह्यांचा लेखाजोखा

जानेवारी 2021 ते मार्च 2021 या तीन महिन्याच्या कालावधीत मुंबई शहरात तब्बल 10,175 वेगवेगळे गुन्हे घडलेले आहेत. यामध्ये गेल्या तीन महिन्यात मुंबई शहरात 41 खुनाचे गुन्हे घडले आहेत. तर खुनाच्या प्रयत्नाचे 100 गुन्हे मुंबईत शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आले आहेत. दरोड्याचे 6 गुन्हे घडले असून रॉबरीचे 206 गुन्हे मुंबई शहरात घडले आहेत. खंडणीचे 87 गुन्हे घडले असून घरफोडीचे 443, चोरीचे 1129, वाहनचोरीचे 901, जखमी करण्याचे 1134, दंगलीचे 78, बलात्काराचे 233, विनयभंगाचे 505 गुन्हे मुंबई शहरात गेल्या तीन महिन्यांमध्ये घडले आहेत. इतर प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांनी 5272 गुन्ह्यांची नोंद केली आहे.

मार्च 2021 या महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरनात वाढ
मार्च 2021 या महिन्यामध्ये मुंबई शहरात 15 खुनाचे गुन्हे घडलेले असून खुणाच्या प्रयत्नांची 34 गुन्हे, दरोड्याचे 2, रॉबरीचे 66, खंडणीचे 25, वाहनचोरीचे 329, चोरीचे 366, जखमी करण्याचे 435, बलात्काराचे 70, विनयभंगाचे 184 गुन्ह्यांची नोंद मुंबई शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेली आहे. मार्च 2021 या महिन्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याचे 35 गुन्हे घडले असून महिलांवरील बलात्काराचे गुन्हे हे सुद्धा 35 नोंदवण्यात आलेले आहेत. मुंबई शहरात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे हे अधिक दिसत असून 112 अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आलेले आहे. तर जानेवारी 2021 ते मार्च 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत मुंबई शहरात तब्बल 282 अल्पवयीन मुलींचे अपहरण झालेले आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! नाशकात चक्कर येऊन एका दिवसात 9 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.