ETV Bharat / city

२६/११: कसाबला ओंबळेंनी असे पकडले, पोलिस अधिकारी बावधनकरांनी सांगितला घटनाक्रम

२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री अचानक सुरू झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने मुंबई हादरली. २६/११ च्या या काळरात्री दहशतवाद्यांनी दोन हॉटेल, रेल्वे स्टेशन, रुग्णालय, ज्यूंचे प्रार्थनास्थळ छाबडा हाऊसवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबईला वाचवण्याचा प्रयत्न केला.

Tukaram Omble
तुकाराम ओंबळे
author img

By

Published : Nov 26, 2020, 2:12 PM IST

Updated : Nov 26, 2020, 3:59 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 26 नोव्हेंबर 2008ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज बारा वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यामध्ये 197 नागरिकांचा जीव गेला, त्यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता. तर, 600 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या काळ्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. मुंबई शहरावर हल्ला करणाऱ्या 10 दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब या एकमेव आरोपीला जिवंत पकडण्यात यश आले होते. मुंबई पोलीस दलातील हवालदार तुकाराम ओंबळे यांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलून कसाबला पकडले होते. तुकाराम ओंबळे यांच्यासोबत पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर हेसुद्धा घटनास्थळी हजर होते. ईटीव्ही भारतने त्यांची घेतलेली ही विशेष मुलाखत...

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी या घटनेच्या कटू आठवणी सांगितल्या

नक्की 'काय' घडले होते -

26 नोव्हेंबर 2008 या दिवशी हेमंत बावधनकर हे डी बी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. 26 नोव्हेंबरला त्यांची रात्रपाळी होती. कामावर हजर झाल्यानंतर लगेचच त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये बोलावले. नरिमन हाऊस, ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल या ठिकाणी गोळीबार सुरू झाल्याचे वरिष्ठांनी सांगितले. तेव्हा तत्काळ हेमंत बावधनकर यांनी गाडी घेऊन गिरगाव चौपाटी येथे जाऊन बीट चौकीमध्ये असलेल्या पोलीस अंमलदारांना आपल्या सोबत घेतले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी लगेच गिरगाव चौपाटीजवळ नाकाबंदी करत या परिसरात असलेली हॉटेल व दुकाने बंद केली. गिरगाव चौपाटीचा परिसर काही वेळातच बावधनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्मनुष्य केला होता.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले अधिकारी व कर्मचारी

पोलीस नियंत्रण कक्षावरून दहशतवादी येत असल्याची मिळाली सूचना -

रात्री अकराच्या सुमारास बावधनकर यांनी गिरगाव चौपाटी येथे तुकाराम ओंबळे व इतर सहकार्‍यांसोबत नाकाबंदीकरून रस्त्यावरची वाहतूक थांबवली होती. यानंतर रात्री बारा वाजता त्यांना पोलीस नियंत्रण कक्षावरून गिरगाव चौपाटीच्या दिशेने एक स्कोडा गाडी येत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या सूचनेवरून हेमंत बावधनकर हे त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावरील दुभाजकावर उभे राहिले व तुकाराम ओंबळे इतर पोलीस अधिकारी हे रस्त्यावर बॅरिकेटिंग केलेल्या ठिकाणी थांबले. रात्री साडेबारावाजता स्कोडा गाडी येऊन पोलिसांपासून 50 मीटर अंतरावर थांबली. या गाडीमध्ये मागच्या सीटवर लपून बसलेल्या अजमल कसाबने स्वतः जवळील जॅकेटमध्ये लपवलेल्या एके 47 मधून गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तुकाराम ओंबळे यांनी क्षणाचाही विचार न करता या गोळ्या आपल्या छातीवर घेत अजमल कसाबला मिठी मारली. यानंतर हेमंत बावधनकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ अजमल कसाबला पकडले.

तुकाराम ओंबळे होते म्हणून आम्ही जिवंत -

दहशतवाद्यांच्या एके-47चा सामना करताना तुकाराम ओंबळे यांनी मोठ्या धाडसाने आपल्या जीवाची बाजी लावली व अजमल कसाबला पकडले. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या देशाचा आणि सहकाऱ्यांचा विचार केला. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळेच त्या दिवशी घटनास्थळी असलेले पोलीस कर्मचारी व अधिकारी जिवंत आहेत व आजही पोलीस सेवेत कर्तव्य बजावत आहेत, असे उद्गार पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी काढले.

हेही वाचा - '26/11' मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण; हल्ला झालेल्या ठिकाणची जाणून घ्या स्थिती

Last Updated : Nov 26, 2020, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.