ETV Bharat / city

Mumbai Accidents : 'हादसो का शहरात' महिनाभरात 608 दुर्घटना, 26 जणांचा मृत्यू

मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात इमारत, घरं, झाडं, दरड, विजा कोसळणे, शॉक लागणे आदी घटना घडतात. जून महिन्यात मुंबईत 608 घटना घडल्या असून, 26 जणांचा मृत्यू झाला ( 26 Killed In 608 Accidents In Mumbai ) आहे.

Mumbai Accidents
Mumbai Accidents
author img

By

Published : Jul 2, 2022, 7:46 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात इमारत, घरं, झाडं, दरड, विजा कोसळणे, शॉक लागणे आदी घटना घडतात. यामुळे मुंबईला 'हादसों का शहर' असे बोलले जाते. मुंबईत जून महिन्यात तब्बल ६०८ दुर्घटना नोंद झाल्या आहेत. त्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, ५३ जण जखमी झाले आहेत. अशा दुर्घटना घडल्यास मदत करण्यासाठी पालिकेककडून १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले जात ( 26 Killed In 608 Accidents In Mumbai ) आहे.

महिनाभरात २६ जणांचा मृत्यू - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात समुद्रात बुडणे, मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होणे, दरड कोसळून, इमारती घरे झाडे विजा कोसळून मृत्यू होतात. तसेच, काही जण जखमी होतात. यंदा मुंबईत ११ जूनला पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून मुंबईत पावसाळ्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांना सुरुवात झाली आहे. जून महिन्यात एकूण ६०८ दुर्घटनांची नोंद झाली आहे. त्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, ५३ जण जखमी झाले आहेत. जून महिन्यात घर आणि इमारती कोसळण्याच्या ५३ घटना नोंद झाल्या. त्यात २३ जणांचा मृत्यू झाला असून, ४७ जण जखमी झाले आहे. झाड कोसळण्याच्या ३२५ घटना नोंद झाल्या. त्यात ४ जण जखमी झाले आहेत. दरडी कोसळण्याच्या ६ घटना नोंद झाल्या त्यात २ जण जखमी झाले आहे. शॉर्टसर्किटच्या २१३ घटना नोंद झाल्या. तर वीज कोसळण्याच्या ११ घटना नोंद झाल्या असून, त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

धोकादायक इमारतींबाबत कारवाई - मुंबईमध्ये ३३७ इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी १०२ इमारतींचे लाईट पाणी कापले आहे. तर १०९ रिकाम्या केल्या आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. अशा इमारतींना नोटीस देणे, इमारत धोकादायक आहे ते त्या इमारतीमधील रहिवासी आणि इतरांना माहिती व्हावी यासाठी होर्डिंग लावणे, अशी कारवाई केली जाते. इमारतीचे लाईट आणि पाणी कापले जाते. मात्र, काही इमारती कोर्टाच्या आदेशाने खाली करता येत नाहीत, त्या इमारतीमधील नागरिक अंडरटेकिंग देऊन आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर त्या इमारतीत राहत असतात. त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढता येत नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

दरडी कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना प्रशिक्षण - मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळू शकतात अशा ७२ ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यावर त्याठिकाणी बचाव पथक पोहचण्यास काही कालावधी लागतो. दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक पोहोचण्याच्या काळात नागरिकांची पळापळ असते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथोमोपचार देणे याचे १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली.

सहाय्यक आयुक्तांवर कारवाई - पावसाळ्यात इमारती कोसळून दुर्घटना ( Building Collapse In Rain ) घडतात. जीर्ण व जर्जर झालेल्या इमारतीला नोटीस न दिल्यास थेट सहाय्यक आयुक्तांवर कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी दिला आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना समजतील, अशा भाषेत नोटीस पाठवून त्या खाली केल्या पाहिजेत. जे वॉर्ड ऑफीसर ही कार्यवाही करणार नाहीत, त्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच, तात्पुरत्या निवाऱ्याची काही सोय करता येते का हे पाहिले पाहिजे. कारण लोक घरे सोडत नाहीत. केवळ पावसाळ्यादरम्यान त्यांनी काही काळासाठी या घरात राहावेत, असा प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

६ वर्षात ११६६ जणांचा मृत्यू - आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३०६६ जण जखमी झाले आहेत. १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३१५० दुर्घटना घडल्या. यांत १७९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर, ७२२ जण जखमी झाले. २०१३ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये ११६६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

महिन्याभरातील मोठ्या दुर्घटना -

कुर्ल्यात १९ जणांचा मृत्यू - २७ जूनच्या रात्री ११.५० च्या सुमारास कुर्ला पूर्व, शिवसृष्टी रोड येथील कलेक्टर यांच्या जागेवरील नाईक नगर सोसायटीमधील चार मजली डी विंगचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एकूण ३३ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. त्यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला.

चेंबूरमध्ये घराचा स्लॅब कोसळून १ मृत्यू - २३ जून रोजी पुष्पक कंपाऊंड, नवजीवन सोसायटी, चेंबूर येथील एका घराचा स्लॅब कोसळला. या घराच्या वरच्या मजल्यावर गारमेंटचे काम सुरु असतानाच स्लॅब कोसळला. या दुर्घटनेतील १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी १ चा मृत्यू झाला.

मानखुर्दमध्ये लहान मुलीचा मृत्यू - २१ जून रोजी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर जय आंबे झोडपट्टीत एका घरावर कंपाऊंड वॉल कोसळली. त्यात एकाच घरातील ३ जण जखमी झाले. त्यापैकी एका ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

वांद्रे येथे घर कोसळून एकाचा मृत्यू - ८ जून रोजी मध्यरात्री वांद्रे पश्चिम महाराष्ट्र नगर, शास्त्री नगर येथे तीन माजली घर कोसळले. यात १९ जण जखमी झाले. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Amravati Chemist Murder : उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांबाबत केलेल्या पोस्टमुळेचं; पोलीस उपायुक्तांनी केलं स्पष्ट

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.