मुंबई - देशासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा अतिरेक झाला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढत आहे. आतापर्यंतच्या दिवसाच्या रुग्णवाढीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च संख्या गाठत मागच्या २४ तासांत राज्यात २३ हजार ४४८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ लाख ९० हजार ७६५ झाली आहे. राज्यात २ लाख ६१ हजार ४३२ सक्रीय रुग्ण आहेत. तर गुरुवारी राज्यात ४९५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या २८ हजार २८२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.८७५ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात गुरुवारी १४ हजार २५३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ७ लाख ७१५ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.७२ टक्के आहे. मात्र, गुरुवारी २३ हजार ४४६ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ६१ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात कोरोनाचा कहर कायम; सलग दुसऱ्या दिवशी २३ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद - महाराष्ट्र कोरोना बातम्या
देशासह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून सलग दुसऱ्या दिवशी राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.