मुंबई : राज्यात बुधवारी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. राज्यात बुधवारी 23 हजार 179 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर 24 तासांत 84 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात मृत्युदर 2.24 टक्के इतका आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने राज्याची चिंता वाढली आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज यामुळे व्यक्त होत आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत 9 हजार 138 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 21 लाख 63 हजार 391 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 23 लाख 70 हजार 507 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. सध्या राज्यात एकूण 1 लाख 52 हजार 760 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.
राज्यात कोणत्या भागात किती रूग्ण?
- मुंबई महानगरपालिका- 2,377
- ठाणे- 237
- ठाणे मनपा- 516
- नवी मुंबई-367
- कल्याण डोंबिवली- 637
- मीराभाईंदर -107
- रायगड-134
- पनवेल मनपा- 233
- नाशिक-518
- नाशिक मनपा-1,490
- मालेगाव-118
- अहमदनगर- 438
- अहमदनगर मनपा-164
- धुळे- 167
- धुळे मनपा - 170
- जळगाव- 384
- जळगाव मनपा- 186
- नंदुरबार-382
- पुणे- 906
- पुणे मनपा- 2,612
- पिंपरी चिंचवड- 1,206
- सोलापूर- 122
- सोलापूर मनपा- 119
- सातारा - 303
- औरंगाबाद मनपा-979
- औरंगाबाद-166
- जालना-190
- परभणी मनपा-124
- लातूर मनपा-118
- उस्मानाबाद-106
- बीड - 265
- नांदेड मनपा- 262
- नांदेड-224
- अकोला- 113
- अकोला मनपा-342
- अमरावती- 248
- अमरावती मनपा- 221
- यवतमाळ-363
- बुलडाणा-532
- वाशिम - 281
- नागपूर- 707
- नागपूर मनपा-2,698
- वर्धा-360
- भंडारा-144
हेही वाचा - चारच दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांनी गमाविले ५.५ लाख कोटी!