ETV Bharat / city

'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्यावी' - सामना

पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

samana
'लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्यावी'
author img

By

Published : Nov 29, 2019, 9:19 AM IST

मुंबई - सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसले आणि युती तुटली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाली व शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला. दरम्यान, राज्यात सध्या अनेक समस्या असून अशावेळी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून राज्यातील लहान भावाला (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) साथ द्यावी, असे आवाहन शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न

काय आहे आजचा 'सामना' -

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सत्य व न्यायाच्या सर्व कसोट्यांवर उतरून स्थिरस्थावर होईल. पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील.

हेही वाचा - 'आदर्श' प्रकरणात नव्याने तपास नाही, ईडीचे स्पष्टीकरण

केंद्राची भूमिका सहकार्याची हवी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेचे बिनसले आहे, पण नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदी यांची आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात हे सूत्र ध्यानात ठेवले, तर जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या सरकारविषयी मनात राग-लोभ का ठेवायचा? महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा मान दिल्लीने ठेवावा व सरकारच्या स्थैर्याला चूड लागेल, असे काही घडू नये याची काळजी घ्यावी.

Intro:Body:

मुंबई - सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसे आणि युती तुटली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाली व शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला. दरम्यान,  राज्यात सध्या अनेक समस्या असून अशावेळी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून राज्यातील लहान भावाला (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) साथ द्यावी, असे आवाहन शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. 

काय आहे आजचा 'सामना' -

 महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सत्य व न्यायाच्या सर्व कसोट्यांवर उतरून स्थिरस्थावर होईल. पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील.

केंद्राची भूमिका सहकार्याची हवी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेचे बिनसले आहे, पण नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदी यांची आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात हे सूत्र ठेवले तर जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या सरकारविषयी मनात राग-लोभ का ठेवायचा? महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा मान दिल्लीने ठेवावा व सरकारच्या स्थैर्याला चूड लागेल असे काही घडू नये याची काळजी घ्यावी. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.