ETV Bharat / city

राज्यात पुरामुळे 213 जणांचा मृत्यू, तर 8 जण अद्यापही बेपत्ता

राज्य सरकारकडून मिळालेल्या आकड्यांनुसार आतापर्यंत 213 लोकांचा जीव या पूर परिस्थितीमुळे गेले आहेत. तर तिथेच अद्यापही 8 जण बेपत्ता आहेत. रायगडच्या तळई गावात गावकऱ्यांच्या विनंतीनंतर शोधकार्य थांबण्यात आले आहे.

पूर
पूर
author img

By

Published : Jul 28, 2021, 10:15 PM IST

मुंबई - राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे 213 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 8 जण अद्यापही बेपत्ता असून 52 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या सोबतच संपूर्ण राज्यभरात 398 जनावरांचा मृत्यू तर 60882 कोंबड्या मारल्या गेल्या आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने घातलेले थैमान यामुळे अनेकांचे जीव गेले. खास करून रायगड येथील महाड तालुक्यात असणाऱ्या तळई गावात दरड कोसळून आतापर्यंत 95 गावकऱ्यांचा जीव गेला आहे. तर यासोबतच चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अजूनही परिस्थिती पूर्वपदावर यायला वेळ लागणार आहे. काही ठिकाणी दरड कोसळून निष्पाप लोकांचे जीव गेले. राज्य सरकारकडून मिळालेल्या आकड्यांनुसार आतापर्यंत 213 लोकांचा जीव या पूर परिस्थितीमुळे गेले आहेत. तर तिथेच अद्यापही 8 जण बेपत्ता आहेत. रायगडच्या तळई गावात गावकऱ्यांच्या विनंतीनंतर शोधकार्य थांबण्यात आले आहे.

जिल्हा निहाय आकडेवारी

  • रायगड- 95 मृत्यू, 26 जण जखमी, तर 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
  • रत्नागिरी - 35 जणांचा मृत्यू, 1 जण बेपत्ता, 10 जण जखमी तर 115 जनावरांचा मृत्यू
  • कोल्हापूर - 7 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता तर 110 जनावरांचा मृत्यू
  • सातारा - 46 जणांचा मृत्यू, तर 3 जण बेपत्ता आहेत. मात्र साताऱ्यामध्ये 41 जनावरांचा मृत्यू
  • सिंधुदुर्ग- 4 जणांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता तर 1 व्यक्ती जखमी, 30 जनावरांचा मृत्यू
  • मुंबई - 4 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी
  • पुणे - 3 जणांचा मृत्यू तसेच 8 जनावरांचा मृत्यू तर एक जण बेपत्ता
  • ठाणे - 15 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी, 1 जण बेपत्ता, तर 15 जनावरांचा मृत्यू
  • वर्धा 2 जणांचा मृत्यू
  • अकोला - 2 जणांचा मृत्यू

पूरजन्य परिस्थिती आणि दरड कोसळल्यामुळे राज्यामध्ये एकूण आतापर्यंत 213 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर तिथेच शंभर जण अद्यापही बेपत्ता आहेत. किरकोळ आणि गंभीर अशी जखम होऊन 52 नागरिक जखमी झाले आहेत. रायगड, रत्नागिरीची गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकार कडून दोन्ही जिल्ह्याला तत्काळ प्रत्येकी दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर तिथेच इतर जिल्ह्यांना प्रत्येकी पन्नास लाखाची मदत देण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यात एनडीआरएफच्या 16 टीम कार्यरत आहेत. त्यात ठाणे येथे 1 टीम, कोल्हापूर येथे 6 NDRF आणि आर्मीची 1 टीम कार्यरत, रत्नागिरीत 2 NDRF टीम, सांगलीत 4 NDRF तर आर्मी 2 टीम, सातारा 2 आणि सिंधुदुर्ग 1 NDRF टीम कार्यरत आहेत. तर आत्तापर्यंत राज्यभरातून 435879 एवढ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.