मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. पूर आल्याने, तसेच दरडी कोसळल्याने आतापर्यंत (२७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत) एकूण २०९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही ८ नागरिक बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातून सुमारे ४ लाख ३४ हजार १८५ नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढल्याची माहिती राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिली.
हेही वाचा - राजकारणाची खुमखुमी असलेल्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा - नाना पटोले यांची मागणी
२०९ नागरिकांचा मृत्यू -
मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच, रायगड आणि सातारा आदी ठिकाणी दरड कोसळली आहे. या ठिकाणी बचाव कार्य आणि शोध मोहीम सुरू आहे. राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे ४ लाख ३४ हजार १८५ नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण २०९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ५२ लोकं जखमी आहे. ८ लोकं बेपत्ता आहेत. ३८४ जनावरे आणि ५८ हजार ३३८ कोंबड्या व कुक्कुट पालन पक्षांचा, अशा एकूण ५८ हजार ७२२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
बचाव कार्य -
मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या राज्यात एनडीआरएफची 16 आणि भारतीय आर्मीची 3 पथके बचाव कार्य करत आहेत. 308 निवारा केंद्र सुरू करण्यात आली असून त्यात 2 लाख 51 हजार 304 नागरिकांच्या निवारा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यामध्ये आलेल्या गंभीर पूर परस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रत्येकी 2 कोटी व अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
हेही वाचा - शरद पवार-ममता बॅनर्जी यांची 28 जुलैला दिल्लीत भेट होण्याची शक्यता