मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात आज पुन्हा दिवसाच्या रुग्णवाढीमध्ये २४ तासांत २० हजार ५९८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ८ हजार ६४२ झाली आहे. राज्यात २ लाख ९१ हजार २३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ४५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३२ हजार ६७१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज २६ हजार ४०८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ८ लाख ८४ हजार ३४१ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.१७ टक्के आहे. आज २० हजार ५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ९८ हजार २३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
९२ हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५४ लाखांवर!
गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 92 हजार 605 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 54 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली. यासोबतच, काल शनिवारी दिवसभरात एकूण 1,133 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 86 हजार 752 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 54 लाख 620 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 10 लाख 10 हजार 824 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 43 लाख 3 हजार 44 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, काल शनिवारी दिवसभरात 12 लाख 6 हजार 806 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 6 कोटी, 36 लाख, 61 हजार 60 एवढी झाली आहे.