ETV Bharat / city

गणेश विसर्जनावेळी महाराष्ट्रात एकूण 20 जणांचा मृत्यू, राज्यात 14 जण बुडाले - Anant chaturdashi 2022

विसर्जनाला काही ठिकाणी लोकांचा बुडून मृत्यू झाल्याने गालबोट लागले. राज्यातील काही भागांत गणेशमूर्तींच्या (immersion of Ganesh idols) विसर्जनाच्यावेळी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला (20 dead in parts of Maharashtra). त्यापैकी 14 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

गणेश विसर्जनाच्यावेळी महाराष्ट्रात एकूण 20 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 10, 2022, 5:31 PM IST

मुंबई - अनंत चतुर्दशीला राज्यभर गणरायाचे विसर्जन करण्यात आले (immersion of Ganesh idols). मात्र या विसर्जनाला काही ठिकाणी लोकांचा बुडून मृत्यू झाल्याने गालबोट लागले. राज्यातील काही भागांत गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्यावेळी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला (20 dead in parts of Maharashtra). त्यापैकी 14 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. 31 ऑगस्टपासून सुरू झालेला 10 दिवसांचा गणेशोत्सव शुक्रवारी संपला (Ganpati visarjan 2022).

वर्धा जिल्ह्यात, सावंगी येथे तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. तर देवळी येथे अशाच प्रकारे आणखी एकाचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात मूर्ती विसर्जनाच्यावेळी तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यात, सुपा आणि बेलवंडी येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाला. चाळीसगाव आणि जामनेर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव आणि यवत, धुळे जिल्ह्यातील एका ठिकाणी, सातारा जिल्ह्यातील लोणीकंद आणि सोलापूर शहरात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागपूर शहरातील सक्करदरा येथे गणेश विसर्जनाच्यावेळी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. ठाण्यात मुसळधार पावसामुळे कोलबाड परिसरात गणेश मंडळावर झाड कोसळून ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विसर्जनाच्या आधी गणेशमूर्तीची आरती सुरू असताना मंडपावर एक मोठं झाड कोसळलं. या अपघातात राजश्री वालावलकर ही महिला गंभीर जखमी झाली. तिला आणि इतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला मृत घोषित करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून नऊ महिन्यांच्या चिमुकल्यासह 11 जण जखमी झाले आहेत. वडघर कोळीवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी विद्युत जनरेटरची केबल तुटल्याने ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मिरवणुकीत सहभागी असलेले किमान 11 जण या केबलच्या संपर्कात आले आणि ते जखमी झाले. जखमींमध्ये चार जणांचा समावेश आहे. त्यापैकी काहींना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तर काहींना पनवेल येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.

गणेश विसर्जनावेळी महाराष्ट्रात एकूण 20 जणांचा मृत्यू

इतर काही घटना कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत काही लोकांनी महापौरांच्या बंगल्यावर दगडफेक केली. पुणे शहरातील मुंढवा येथे दोन गटात हाणामारी झाली. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे फटाके फोडण्यावरून भांडण झाले. तर चंद्रपुरात गणेश मंडळाचे स्वयंसेवक आणि पोलिस कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.