ETV Bharat / city

पनवेल: आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता 2 हजार डोस दाखल

author img

By

Published : Jan 16, 2021, 4:05 AM IST

Updated : Jan 16, 2021, 5:28 PM IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील एमजीएम कामोठे, येरळा मेडिकल हॉस्पिटल येथे नगरपालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

कोरोना लस आल्याने आनंद
कोरोना लस आल्याने आनंद

नवी मुंबई - पनवेलमध्ये कोरोना लशीचा साठा दाखल झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 2 हजार लशीचे डोस आले आहेत. पहिल्या टप्प्यात आज आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

कोरोनाचे लसीकरण दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण होणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील एमजीएम कामोठे, येरळा मेडिकल हॉस्पिटल येथे नगरपालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य कर्चमाऱ्यांना आज लस देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना लशीचा दुसरा डोस पुन्हा 28 दिवसानंतर देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी यांनी दिली. ते म्हणाले की, रायगड येथून कोव्हिशील्डचे 2 हजार डोस दाखल झाले आहेत. या लशीचे स्टोरेज करण्यात आले आहे. लसीकरणासाठी साडेपाच हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. लशीचा साठा जसजसा मिळेल, तसे लसीकरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, देशभरात आजपासून कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होत आहे. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट पूर्णपणे टळेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Last Updated : Jan 16, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.