ETV Bharat / city

Mumbai Ganeshotsav 2022 मुंबईत विनापरवानगी गणेशोत्सव, ३२५५ अर्जांपैकी १९४७ मंडळांना परवानगी - मुंबई गणेशोत्सवासाठी १९४७ मंडळांना परवानगी

मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव Mumbai Ganeshotsav 2022 साजरी करणारी सुमारे १२ हजार मंडळे आहेत. त्यापैकी दरवर्षी दोन ते अडीच हजार मंडळे परवानगी मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज करतात. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी आतापर्यंत एकूण ३२५५ मंडळांनी out of 3255 applications परवानगीसाठी अर्ज केले असून यातील १९४७ मंडळांना 1947 mandals allowed पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. तर विविध कारणाने ४१५ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तसेच परवानगीच्या प्रक्रियेत २७३२ अर्ज असून या अर्जांनाही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असल्यास ऑगस्ट अखेरपर्यंत रीतसर परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त शरद काळे यांनी दिली.

1947 mandals allowed out of 3255 applications for ganeshotsav 2022 in mumbai
मुंबईत विनापरवानगी गणेशोत्सव
author img

By

Published : Aug 25, 2022, 7:21 AM IST

मुंबई महानगरामध्ये अकरा दिवस गणेशोत्सव Mumbai Ganeshotsav 2022 सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. हा सण मुंबईमध्ये तब्बल १२ हजार मंडळे साजरा करतात. मात्र पालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या परवानगीसाठी केवळ ३ हजार out of 3255 applications मंडळांकडून परवानगी मागितली जाते. त्यापैकी सुमारे २ हजार 1947 mandals allowed मंडळांनाच परवानगी मिळते. यावरून इतर बहुसंख्य मंडळे परवानगी न घेताच गणेशोत्सव साजरा करतात हे समोर आले आहे.

या परवानग्या आवश्यक मुंबईमध्ये गणेशोत्सव हा सण ११ दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यासाठी महिना दोन महिने आधीच गणेशोत्सव मंडळांकडून तयार सुरु केली जाते. गणेश उत्सव साजरा करण्यासाठी उंच मुर्त्यांचा वापर केला जातो. त्यासाठी मंडपही मोठे लागतात. मुंबई शहरात बहुसंख्य मंडप रस्त्यावर, चौकात उभारले जातात. तर बहुसंख्य मंडप रहिवाशी वस्ती, सोयायटीत, वस्तीमध्ये असलेल्या उद्यानामध्ये उभारले जातात. मंडप उभारण्यासाठी पालिकेची, पोलिसांची, ट्रॅफिक पोलिसांची तसेच अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागते. मात्र बहुसंख्य मंडळे ही केवळ पोलिसांकडून स्पीकर लावण्याची परवानगी घेतात. इतर परवानग्या घेत नाहीत अशी माहिती एका गणेशउत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली.

३२५५ अर्ज, १९४७ मंडळांना परवानगी मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरी करणारी सुमारे १२ हजार मंडळे आहेत. त्यापैकी दरवर्षी दोन ते अडीच हजार मंडळे परवानगी मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज करतात. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी आतापर्यंत एकूण ३२५५ मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले असून यातील १९४७ मंडळांना पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. तर विविध कारणाने ४१५ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तसेच परवानगीच्या प्रक्रियेत २७३२ अर्ज असून या अर्जांनाही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असल्यास ऑगस्ट अखेरपर्यंत रीतसर परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त शरद काळे यांनी दिली.

यामुळे परवानगीची आवश्यकता नाही मुंबईमध्ये १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी ४० टक्के मंडळे शहरात तर ६० टक्के मंडळे उपनगरात आहेत. बहुसंख्य मंडळे सोसायटीच्या जागेत गणेशोत्सव साजरा करतात. यामुळे त्यांना परवानगीची आवश्यकता नाही. तांत्रिक बाबींमुळे पालिकेच्या, पोलिसांकडून मंडळांना परवानगी मिळलेली नाही. यासाठी अर्ज करण्यास ४ दिवसांची मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली आहे. पालिका ती मुदतवाढ देईल. पालिकेने मंडप उभारणीचे शुल्क रद्द केले आहे. त्याच प्रमाणे पोलीस आयुक्तांकडे झालेल्या बैठकीतही स्पीकर लावण्यासाठी घेतले जाणारे शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. ही मागणी पोलीस आयुक्तांनी मान्य केली आहे अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.