मुंबई - मुंबईत गेल्या एक वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका आणि पालिकेचा आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. यादरम्यान पालिकेचे १९१ अधिकारी कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी ४६ कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. इतर १३ जणांना केंद्रीय योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदत करण्यात येणार आहे. उर्वरित १३२ कर्मचारी अधिकाऱ्यांना लवकरच मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हे ही वाचा- राज्याचा अर्थसंकल्प निराशाजनक; केंद्राच्याच योजनांचा अर्थसंकल्पात समावेश -फडणवीस
१९१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू -
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण मुंबईत गेल्या मार्च महिन्यात आढळून आला. २३ मार्चला मुंबईत लॉकडाऊन करण्यात आला. दोन महिने लॉकडाऊन होते. त्यानंतर त्यात टप्प्या-टप्प्याने शिथिलता देण्यात आली. या दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांपासून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना अन्न पाकिटे, पाणी वाटप, रुग्णांना बरे करणे, मुंबईत स्वच्छता राखणे, रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात सॅनिटायझेशन करणे, रुग्णांची रुग्णालयात कोरोना सेंटरमध्ये सुविधा करणे आदी सर्वच कामासाठी पालिका कर्मचारी प्रयत्न करत होते. यात गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेचे ५ हजाराहून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यापैकी १९१ अधिकारी कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
हे ही वाचा - शेतकऱ्यांना कृषी वीजबिलात मिळणार ३३ टक्के सवलत
८९ कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मदत बाकी -
केंद्र सरकारने कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कटुबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. यानुसार पालिकेनेही ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे जाहीर केले. केंद्र सरकारकडून त्यांच्या नियमात बसणाऱ्या फक्त १३ कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत दिली. पालिकेने केलेल्या घोषणेप्रमाणे इतरांना आर्थिक मदत कधी केली जाणार, अशी विचारणा सातत्याने होत होती. त्यासाठी पालिकेने १९१ मृतांपैकी ४६ शहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये दिले आहेत. तर ८९ शहीद कर्मचाऱ्यांची कागदोपत्री पूर्तता झाल्यावर लवकर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.