ETV Bharat / city

Central Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेचा १८ तासांचा मेगा ब्लॉक; 'या' रेल्वे गाड्या रद्द

मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहाव्या मार्गिकेच्या पायाभूत कामासाठी रविवारी, (ता. 19) रोजी सकाळी 8 वाजेपासून ते सोमवारी, (ता.20) रोजी रात्री 2 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लाॅक ( Central Railway Mega Block ) असणार आहे. परिणामी, उपनगरीय रेल्वेवर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात (Central Railway Time Table Change ) बदल करण्यात आला आहे.

Central Railway Mega Block
Central Railway Mega Block
author img

By

Published : Dec 17, 2021, 9:26 PM IST

Updated : Dec 17, 2021, 10:58 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहाव्या मार्गिकेच्या पायाभूत कामासाठी रविवारी, (ता. 19) रोजी सकाळी 8 वाजेपासून ते सोमवारी, (ता.20) रोजी रात्री 2 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लाॅक ( Central Railway Mega Block ) असणार आहे. परिणामी, उपनगरीय रेल्वेवर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात (Central Railway Time Table Change ) बदल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया

अस असणार वेळापत्रक -

या ब्लॉक कालावधीत कल्याण येथून ०७.४७ ते २३.५२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा दिवा आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व या सेवा मुंब्रा आणि कळवा येथे थांबणार नाहीत. पुढे मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. तर या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या व मुलुंड येथून ०७.४२ ते ०१.१५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या/अर्ध-जलद सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व कळवा आणि मुंब्रा येथे थांबणार नाहीत. पुढे दिवा स्थानकावर डाउन धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ब्लॉक कालावधीत कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

शनिवारी या गाड्या रद्द -

  • 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस
  • 17611 नांदेड- मुंबई एक्सप्रेस
  • 11030 कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस

रविवारी या गाड्या रद्द-

  • 11007 / 11008 मुंबई - पुणे - मुंबई डेक्कन एक्सप्रेस
  • 12109 /12110 मुंबई - मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेस
  • 12071 /12072 मुंबई - जालना- मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
  • 11401 मुंबई -आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
  • 12123 /12124 मुंबई -पुणे - मुंबई डेक्कन क्वीन
  • 12111 मुंबई -अमरावती एक्सप्रेस
  • 11139 मुंबई- गदग एक्सप्रेस
  • 17612 मुंबई-नांदेड एक्सप्रेस
  • 11029 मुंबई- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
  • 11402 आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
  • 11140 गदग -मुंबई एक्सप्रेस

या गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन -

17317 हुबळी -दादर एक्सप्रेस १८ डिसेंबर २०२१ रोजी सुटणारी पुणे येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल आणि 17318 दादर-हुबळी एक्सप्रेस १९ डिसेंबर २०२१ रोजी सुटणारी ट्रेन पुण्याहून शॉर्ट ओरिजिनेट होऊन निघेल.

हेही वाचा - Omicron In Pune : पुण्याच्या ग्रामीण भागात ओमायक्रॉनची एंट्री; दुबईहून परतलेल्या ७ जणांना लागण

Last Updated : Dec 17, 2021, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.