मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आता पुन्हा एकदा बीए ४ व बीए ५ व्हेरीयंटचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. बीए व्हेरीयंटचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ झाली ( Mumbai Omicron Cases ) आहे.
सर्व नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन - मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा यांच्या ताज्या अहवालानुसार मुंबई येथे बीए ५ व्हेरीयंटचे १७ आणि बीए ४ चे ६ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांच्या अहवालाचे पुनरावलोकन एन आय व्ही पुणे यांचे मार्फत करण्यात आले आहे. दरम्यान, कस्तुरबा प्रयोगशाळेने एकूण ३६४ नमुन्यांचे परीक्षण केले असून, त्यापैकी एक नमुना वगळता सर्व नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन हाच व्हेरियंट आढळलेला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
व्हेरीयंटचे रुग्ण सर्वाधिक प्रमाणात - राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत २८, नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ आढळले आहेत.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत 840 कोरोना रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू