मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेली धारावी गेल्या वर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. या वर्षी दुसऱ्या लाटेनंतर धारावीकरांनी कोरोनावर दुसऱ्यांदा मात केली होती. मात्र, आता पुन्हा धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली ( Covid Spread In Dharavi ) आहे. गेल्या २४ तासात धारावीत १७ रुग्णांची नोंद झाली ( Covid Positive Patients ) आहे. यामुळे धारावीत पुन्हा कोरोना पसरत असल्याचे दिसत आहे. हा प्रसार रोखण्याचे आरोग्य विभाग आणि पालिकेपुढे मोठे आव्हान असणार ( BMC Health Department ) आहे.
-
Maharashtra reports 85 new cases of #Omicron variant of Coronavirus
— ANI (@ANI) December 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
State records 3,900 fresh COVID cases and 20 deaths today, taking total active cases to 14,065 pic.twitter.com/xcuTMKbYxV
">Maharashtra reports 85 new cases of #Omicron variant of Coronavirus
— ANI (@ANI) December 29, 2021
State records 3,900 fresh COVID cases and 20 deaths today, taking total active cases to 14,065 pic.twitter.com/xcuTMKbYxVMaharashtra reports 85 new cases of #Omicron variant of Coronavirus
— ANI (@ANI) December 29, 2021
State records 3,900 fresh COVID cases and 20 deaths today, taking total active cases to 14,065 pic.twitter.com/xcuTMKbYxV
धारावी हॉटस्पॉट, पुन्हा रुग्ण संख्या वाढली
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने गेल्यावर्षी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट ( Dharavi Covid Hotspot ) झाली होती. गेल्या वर्षी पाहिल्या लाटेदरम्यान ( Covid First Wave Mumbai ) धारावीत दिवसाला ७० हुन अधिक रुग्णांची नोंद झाली होती. ८ एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. कित्तेकवेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहे. गेल्या २४ तासात धारावीत १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी १८ मे ला सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती. आज १७ नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ७२१९ इतकी झाली आहे. आतापर्यंत ६७५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ४३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत आज 2510 नव्या रुग्णांची नोंद
आज २९ डिसेंबरला २५१० नवे रुग्ण आढळून आले ( Covid Cases In Mumbai ) आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली ( Covid Deaths In Mumbai ) आहे. आज २५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत एकूण ७ लाख ७५ हजार ८०८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ४८ हजार ७८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८०६० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के ( Covid Recovery Rate Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६८२ दिवस इतका ( Covid Doubling Rate Mumbai ) आहे. मुंबईमधील ४५ इमारती आणि एक झोपडपट्टी सील करण्यात आली आहे. २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.१० टक्के इतका आहे.