मुंबई - आईने मोबाईल गेम खेळू न दिल्याने मुंबईतील एका १६ वर्षीय मुलाने गुरुवारी ( 16 Year old Suicide ) आत्महत्या केली. आईसाठी सुसाईड नोट टाकल्यानंतर त्याने ट्रेनसमोर उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 8 जूनच्या संध्याकाळी मुलाच्या आईने तो मोबाईलवर गेम खेळत असताना त्याचा फोन काढून घेतला आणि त्याला अभ्यास करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने सुसाईड नोट लिहून घर सोडले.
जेव्हा त्याची आई घरी पोहोचली आणि चिठ्ठी वाचली तेव्हा तो आत्महत्या करणार आहे आणि तो परत येणार नाही, असे चिठ्ठीत लिहिले होते. त्यानंतर कुटुंबियांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला. मालाड आणि कांदिवली स्थानकादरम्यान लोकल समोर कोणीतरी उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्वरित त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, याच मुलाने सुसाईड नोट लिहिल्याचे तपासात समोर आले आहे. बोरिवली जीआरपी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - नुपूर शर्माच्या अटकेच्या मागणीकरिता जमाव हिंसक, रांचीमध्ये पोलिसांवर दगडफेक