ETV Bharat / city

आरोग्य विभागात तातडीने 16 हजार पदे भरणार - राजेश टोपे - health department posts

राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

health minister Rajesh Tope
राजेश टोपे
author img

By

Published : May 6, 2021, 3:31 PM IST

मुंबई - राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार आहेत. तर क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्याची प्रक्रिया लगेच सुरु होईल, असे टोपे म्हणाले.

राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण - टोपे

राज्यात कोरोनाचे संकट वाढते आहे. दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागातील विविध खात्यात भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. परंतु, राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी अशी मागणी केली.

हेही वाचा - छत्रसाल स्टेडिअममध्ये झालेल्या खूनाप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमार दिल्ली पोलिसांच्या रडावर

तिसरी लाट येण्याची शक्यता, त्यामुळे लवकरात लवकर भरती होणार -

येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर यावेळी ताण येण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकर राबवणार असल्याचे टोपे म्हणाले.

सध्यस्थिती लक्षात घेता राज्यातील आरोग्य विभागातील अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. लवकरच मुख्यमंत्री आदेश काढतील, असे टोपे म्हणाले.

हेही वाचा - राष्ट्रीय लोक दलचे प्रमुख अजित सिंह यांचे कोरोनाने निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.