ETV Bharat / city

फेसबुकवरील मित्रासाठी जोधपूरच्या शिक्षिकेने भरले 16 लाख; अखेर चार आरोपी मुंबई जेरबंद

जोधपूरमधील एका शिक्षिकेला तब्बल 16 लाख रुपयांचा गंडा घातला होता. या गुन्ह्यातील चार आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष आरोपींचा समावेश आहे.

mumbai police news
फेसबुकवरील मित्रासाठी जोधपूरच्या शिक्षिकेने भरले 16 लाख; अखेर चार आरोपी मुंबई जेरबंद
author img

By

Published : Dec 9, 2020, 7:18 PM IST

Updated : Dec 9, 2020, 7:32 PM IST

मुंबई - जोधपूरमधील एका शिक्षिकेला तब्बल 16 लाख रुपयांचा गंडा घातला होता. या गुन्ह्यातील चार आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष आरोपींचा समावेश आहे.

mumbai police news
चार आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

सोशल मीडियावर ब्रिटनमधील व्यक्तीशी मैत्री

राजस्थानमधील जोधपूरच्या एका शिक्षिकेची ब्रिटनच्या नागरिकाशी सोशल मीडियावर ओळख झाली. मार्को असे या व्यक्तीचे नाव होते. सुरुवातीला चॅटिंग करता करता या दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. यावेळी मार्को हा ब्रिटनमधील एका बड्या कंपनीत रिसर्चर म्हणून काम करत असल्याचे त्यांने सांगितले. त्यानंतर एका प्रयोगासाठी आपण भारतात येणार असल्याचे या शिक्षिकेला सांगून प्रयोगासाठी आवश्यक साहित्य एअर कुरियरने भारतात पाठवत असल्याची माहिती दिली.

mumbai police news
चार आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

या पार्सलमध्ये तीस हजार पाऊंड असल्याची थाप त्यांने मारली. तसेच इमिग्रेशच्या प्रक्रियेत हे पार्सल अडकून पडल्याने त्यासाठी सीमाशुल्क भरावे लागेल, असे मार्कोने शिक्षिकेला सांगितले. त्यानुसार पीडित शिक्षिकेने फेसबुकवरील मित्रासाठी टप्प्याटप्प्याने 16 लाख रुपये भरले होते. या शिक्षिकेचा विश्वास बसावा म्हणून आरोपींनी रिजर्व बँक ऑफ इंडिया व दिल्लीच्या सायबर विभागाकडून आलेले बनावट ईमेल सुद्धा पाठवले होते.

पैसे मिळाल्यावर तोडला संपर्क

तब्बल 16 लाख रुपये भरल्यानंतर मार्को नावाच्या व्यक्तीने या शिक्षिकेसोबत संपर्क तोडला. शिक्षिकेला संशय आल्याने तिने जोधपूरच्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा नोंदवला. तांत्रिक तपास केल्यानंतर या संदर्भातील चार आरोपी हे मुंबईत असल्याचे लक्षात आले. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश जारी झाले. मुंबई पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष आरोपींचा समावेश आहे.

mumbai police news
चार आरोपींमध्ये दोन पुरुषांचा समावेश आहे.

Last Updated : Dec 9, 2020, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.