मुंबई - शहर आणि परिसरात आज (बुधवार) कोरोनाचे 1,567 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आज एका दिवसातील सर्वाधिक 90 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता तब्बल 52 हजार 445 वर पोहोचला असून मृतांचा आकडा 1,855 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आत्तापर्यंत 23,693 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या मुंबईत एकून 26 हजार 897 सक्रीय कोरोना रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा... CORONA VIRUS : राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद, एकूण आकडा ९४ हजारांवर
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात आज (बुधवार) काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे नव्याने 1567 रुग्ण आढळून आले आहेत. तर 90 जणांचा मृत्यू झाला आहे. 90 पैकी 70 मृत्यू गेल्या 24 तासात झाले असून 20 मृत्यू याआधी झाले आहेत. हे 20 मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचा अहवाल आज आल्याने त्यांचा समावेश आजच्या आकडेवारीत करण्यात आला आहे.
मुंबईमधील 90 मृतांपैकी 80 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 62 पुरुष आणि 35 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 4 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 56 जणांचे वय 60 वर्षावर तर 37 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 751 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 23,693 वर पोहचला आहे.
हेही वाचा... समुद्राचा आणि नागपूरचा काही संबध नाही, पवारांचा फडणवीसांना टोला
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 52,445 वर पोहचला आहे. त्यापैकी 1855 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 23,693 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 26,897 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.