मुंबई -अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. याबाबत ईटीव्ही भारतने सर्वप्रथम बातमी प्रकाशित ( Etv Impact on accident news ) केली होती. यानंतर वाहतूक विभागाने अपघातग्रस्ताला तात्काळ उपचारासाठी दीड हजार वाहतूक आणि महामार्ग पोलिसांना वैद्यकीय उपचाराचे प्राथमिक प्रशिक्षण ( Training for police to save life in Accident ) देण्याचे ठरवले आहे.
गेल्या वर्षात जानेवारी- नोव्हेंबर या 11 महिन्यांत राज्यात 26 हजार 284 रस्ते अपघात झाले ( 26284 road accidents in Maharashtra ) आहेत. यामध्ये 14 हजार 266 प्रवासी जखमी झाले आहेत. रस्ते अपघातात 11 हजार 960 प्रवाशांचा मृत्यू झालेला ( 11960 deaths in road accident ) आहे.
11 हजार 960 जणांचा अपघातात मृत्यू -
वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकाचा निष्काळजीपणा, ओव्हर स्पिडिंग आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण अलीकडे वाढू ( road accident causes in road accident ) लागले आहे. देशात दरवर्षी साधारण 1.50 लाख वाहनचालक रस्ते अपघातांमुळे मृत्युमुखी पडतात. अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जाते. याशिवाय अनेक प्रयत्नही केले जाते. मात्र, राज्यातील अपघातांची संख्या कमी होत नाही. 2021 मधील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अपघातांमध्ये 26 हजार 284 पर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय संबंधित अपघातांमध्ये 11 हजार 960 प्रवाशांचा हकनाक जीव गेला आहे. अपघातात 14 हजार 266 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती (14266 injured in road accident ) आहे. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना त्वरित उपचार न मिळाल्यामुळे अथवा लवकरात लवकर रुग्णालयात दाखल न केल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे.
संबंधित बातमी वाचा-ईटीव्ही विशेष बातमी : राज्यात अकरा महिन्यांमध्ये रस्ते अपघातात 11 हजार 960 जणांचा मृत्यू
दीड हजार पोलिसांना प्रशिक्षण मिळणार -
दरवर्षी राज्यात अपघातांनंतर वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांचे जीव जात असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले. म्हणूनच अपघात घडल्यानंतर पहिल्या एका तासात अर्थात ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी ‘हायवे मृत्युंजय दूत’ ही अनोखी मोहीम गेल्या वर्षी राबवली. ‘हायवे मृत्युंजय दूत’ मोहिमेत महामार्गावरील पेट्रोलपंप कर्मचारी, टोल नाक्यावरील कर्मचारी, हॉटेल व ढाब्यावरील कामगार यांना अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशिक्षित करण्यात आले होते. त्याला स्थानिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यात 6 हजारांपेक्षा अधिक ‘मृत्युंजय दूत’ कार्यरत आहेत. आजतागायत हजारो जखमींचा जीव वाचविण्यात या स्वयंसेवकांनी मदत केल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. याशिवाय रस्ते अपघातामधील मृत्यूंची संख्या कमी होण्यासाठी नव्या मोहीमेत वाहतूक पोलीस आणि अधिकारी यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे अपघाताच्या ठिकाणी तात्काळ पोहोचलेल्या पोलिसांकडून जखमींना मोलाची मदत होणार आहे.
दोन दिवसीय प्रशिक्षण असणार -
अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना योग्यप्रकारे हाताळणी न झाल्यामुळे किंवा अज्ञानाने हाताळल्यामुळे जखमीचे शरीरास अधिक इजा होण्याची दाट शक्यता असते. अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळण्यासाठी महामार्ग पोलीस सेव्ह लाईफ फाउंडेशनच्यामार्फत पोलिसांना ‘बेसिक ट्रॉमा लाईफ सपोर्ट स्किल ट्रेनिंग देणार आहे. सुरुवातीला मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, रायगड जिल्ह्यामधील 1 हजार 500 पोलिसांना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.