मुंबई - येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंट दुरुस्ती कामामुळे ५ जानेवारीला सकाळी १० ते दिनांक ६ जानेवारी पर्यंत सकाळी १० दरम्यान २४ तासांसाठी मुंबईत १५ टक्के पाणीकपात असणार आहे. याबद्दल माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.
दुरुस्तीचे काम -
बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया २४०० मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंटच्या दुरुस्तीचे काम ५ जानेवारीला हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबई महानगराच्या बहुतांश भागातील पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवार ५ जानेवारीला सकाळी १० वाजल्या पासून बुधवारी ६ जानेवारीच्या सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत खालील नमूद भागांमध्ये १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
पाणी जपून वापरा -
मुंबईमधील बहुतांश भागात ही पाणी कपात असणार आहे. मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या विभागात पाणी कपात -
शहर विभाग -
ए, बी, सी, डी, ई, जी/उत्तर व जी/दक्षिण
पश्चिम उपनगरे -
संपूर्ण पश्चिम उपनगरे (एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व, के/पश्चिम, पी/उत्तर, पी/दक्षिण, आर/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण)
पूर्व उपनगरे -
एल, एन, एस
या विभागात पाणी कपात नाही -
एफ दक्षिण, एफ उत्तर, एम पूर्व, एम पश्चिम आणि टी या पाच विभागात पाणी कपात नसणार आहे.