ETV Bharat / city

मुंबईत पावसाचा कहर; चेंबूरमध्ये भिंत कोसळून 12 जणांचा, तर विक्रोळीत घर कोसळून तिघांचा मृत्यू

या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच चेंबूर आणि विक्रोळीमध्ये दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. चेंबूरच्या भारत नगर परिसरामध्ये दरड कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडं विक्रोळी परीसरात एक दुमजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत 15 जणांचा मृत्यू
मुंबईत 15 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 18, 2021, 10:04 AM IST

मुंबई- शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुंबईच्या अनेक भागात पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे, या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच चेंबूर आणि विक्रोळीमध्ये दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. चेंबूरच्या भारत नगर परिसरामध्ये दरड कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडं विक्रोळी परीसरात एक दुमजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही ठिकाणी एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयामध्ये दाखल केला आहेे.

चेबूरच्या भारत नगरमध्ये झोपड्यांवर कोसळली भिंत-

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायाला मिळत आहे. त्यातच चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास भूस्खलन होऊन एक झाड आणि भिंत कोसळल्याची घटना घडली. ही भिंत तेथील 5 ते 6 झोपड्यांवर कोसळल्याने मध्यरात्री सुमारास झोपेत असणाऱ्या त्या झोपड्यामधील रहिवासी या भितीखाली अडकले गेले. या घनटेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि मुंबई महापावलिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

बचाव पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिकांनी 10 मृतदेह बाहेर काढले होते. पहाटे पावसाचा जोर वाढल्याने बचाव कार्यास अडथळे निर्माण होत होते. या दुर्घटनेत सकाळपर्यंत दुर्दैवाने 12 जणांचे मृतदेह हाती आले होते. तर घटनेतील जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. या भिंतीच्या ढिगाखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान सकाळी आणखी एक जणाचा मृतदेह हाती लागला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 झाला आहे. तर दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून अद्याप बचावकार्य सुरू आहे.

विक्रोळीत 3 जणांचा मृत्यू, 6 जण अडकल्याची भीती-

विक्रोळी येथे देखील मुसळधार पावसामुळे एक दुमजली इमरात कोसळल्याची घटना घ़डली आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. यामध्ये एनडीआरएफच्या पथकाला सकाळी 8.30 पर्यंत 3 मृतदेह हाती लागले आहेत. तर आणखी 5 ते 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता बचाव पथकाकडून व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफचे उप कंमाडंट आशिष कुमार यांनी याबाबतची माहिती दिली.

या दोन्ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केलं. त्याच वेळी बचाव यंत्रणेला देखील माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. या भागात सकाळी पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असलं, तरी पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. त्यामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरांच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरामुळे नेहमीच या भागातील अशा दुर्घटनेची शंका उपस्थित केली जात होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.