ETV Bharat / city

Mumbai News : राणीबागेला २ दिवसात १४ हजार पर्यटकांची भेट - पर्यटकांच्या संख्येत वाढ

मुंबईची राणीबाग ( Ranibagh of Mumbai ) ही पर्यटक आणि बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. शनिवार रविवार या दोन दिवसात तब्बल १४ हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट ( 14 thousand tourists visited Rani Bagh ) दिली. सुट्टीच्या दिवशी या गर्दीत वाढ होते.

Ranibagh of Mumbai
मुंबईची राणीबाग
author img

By

Published : Sep 19, 2022, 12:18 PM IST

मुंबई : मुंबईची राणीबाग ( Ranibagh of Mumbai ) ही पर्यटक आणि बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन, वाघ, बिबट्या, अस्वल आदी प्राणी पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ ( Increase in number of tourists ) होत आहे. सुट्टीच्या दिवशी या गर्दीत वाढ होते. शनिवार रविवार या दोन दिवसात तब्बल १४ हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यामधून राणीबागेला ५ लाख ७८ हजार ८५५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

राणीबागेत पर्यटकांची संख्या वाढतेय : भायखळा येथे मुंबई महापालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय आहे. हे उद्यान व प्राणीसंग्रहालय राणी बाग म्हणून ओळखले जाते. त्यात दुर्मिळ झाडे, पक्षी, प्राणी आहेत. ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक राणी बागेत येतात. राणीबागेत काही वर्षांपूर्वी परदेशी पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर वाघ, बिबट्या, तरस, अस्वल आदी प्राणी आणण्यात आले आहेत. विविध प्राण्यांमुळे राणीबागेतील पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

दोन दिवसात १४ हजार पर्यटकांनी भेट दिली : राणीबागेला शनिवारी ५९६२ पर्यटकांनी भेट दिली. त्यामधून २ लाख ४३ हजार ४६० रुपये महसूल प्राप्त झाला. रविवारी ८२३९ पर्यटकांनी भेट दिली. त्यामधून ३ लाख ३५ हजार ३९५ रुपये महसूल प्राप्त झाला. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसात १४ हजार २०१ पर्यटकांनी भेट दिली त्यात ५ लाख ७८ हजार ८५५ रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे अशी माहिती राणीबागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

राणीबागेत हे प्राणी आणि पक्षी : पालिकेच्या या प्राणी संग्रहालयात नऊ पेंग्विन, दोन वाघ, वाघाचा बछडा, बिबट्या, तरस, अस्वल, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.