ETV Bharat / city

Breaking news : भाजप-शिवसेना एकत्र आले पाहिजे..ही माझी प्रामाणिक इच्छा - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले - 14 November 2021

Breaking news: Congress marches against central government in Mumbai
Breaking news : मुंबईत कॉंग्रेसची केंद्र सरकारविरोधात पदयात्रा
author img

By

Published : Nov 14, 2021, 6:28 AM IST

Updated : Nov 14, 2021, 4:03 PM IST

14:12 November 14

भाजप - शिवसेना एकत्र आले पाहिजे..ही माझी प्रामाणिक इच्छा -ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

13:14 November 14

काँग्रेसच्यावतीने आजपासून पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देश पन्नास वर्षे मागे गेला आहे - नाना पटोले

  • देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि  शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत
  • गरीब माणूस संपाच्या मार्गावर आहे.  संविधान धोक्यात आले आहे
  • मोदी सरकारचे सर्व कारनामे जनतेसमोर मांडणार आहे.
  • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दर सहा महिन्याने का बदलतात, सगळ्या गोष्टी या पदयात्रेच्या जनजागरण मोहिमेच्या माध्यमातू मांडणार आहे,
  • काँग्रेसच्या वतीने आजपासून पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा सुरू करण्यात आली आहे
  • काँग्रेसच्या देवडिया भवनातून यात्रेला सुरुवात झाली असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रा निघाली आहे

11:17 November 14

त्रिपुरामध्ये काही घडलंच नाही तर व्हिडिओ आणि फोटो काय आहे? - संजय राऊतांचा सवाल

मुंबई - त्रिपुरामध्ये काही घडलंच नाही तर व्हिडिओ आणि फोटो काय आहे? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

  • अमरावती येथे झालेला हिंसाचार, हा सर्व महाराष्ट्रला अस्थिर करण्याचा आणि तणाव निर्माण करायचा  डाव आहे, असेही राऊत म्हणाले.
  • रझा अकादमी काय म्हणत आहे मला माहित नाही, मात्र रझा अकादमीमध्ये दंगली भडकवण्याच्या ताकद नाही
  • त्रिपुरामध्ये असे काय घडले, की त्याचे पडसाद राज्यात पडत आहे?
  • बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेशमध्ये याचे पडसाद का पडत नाही, महाराष्ट्रातच का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

काश्मीरी पंडितांविरोधातील हल्ल्याविरोधात आंदोलन करावे 

  • काश्मीरमध्ये हिंदू पंडिताना मारले जाते, त्या विरोधात कोणी आंदोलन का नाही करत
  • काश्मीरी पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात खर तर दिल्लीमध्ये आंदोलन झाले पाहिजे.  या आंदोलनाचे नेतृत्व सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले पाहिजे, का नाही करत, असाही सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला.
  • रझा अकादमी जर म्हणत असेल आम्ही नाही केलं, तर मग कोणी केलं, असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

10:09 November 14

भाजप नेत्या निवेदिती चौधरी आणि अनिल गोंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती, भाजप नेते स्थानबद्ध

अमरावती - भाजप नेत्या निवेदिती चौधरी आणि अनिल गोंडे यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. अमरावतीत शनिवारी बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शहरात चार दिवसांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.  

10:05 November 14

पालघरमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पालघर - पालघरमध्ये एसटी कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. जव्हार आगारात ही धक्कादायक घटना घडली आहे. कर्मचाऱ्यावर  जव्हार कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.  

09:06 November 14

अमरावती शहरासह ग्रामीण भागात मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू

अमरावती - अचलपूर, परतवाडा, कांडली परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे

- अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पत्रक जारी करण्यात आले आहे 

- भाजप महिला जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी अमरावती ग्रामीण बंद चे आवाहन केले होते

- अमरावती शहराची परिस्थिती लक्षात घेता, ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था राहावी याकरिता काही भागात संचारबंदी लागू

- ५ हुन अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी 

- या संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यां विरोधात कारवाईचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश जारी 

07:40 November 14

शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबाद - शिवसेनेच्या आक्रोश मोर्चा प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल

06:21 November 14

Breaking news : मुंबईत कॉंग्रेसची केंद्र सरकारविरोधात पदयात्रा

मुंबई - आजपासून कॉंग्रेसचे जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. मुंबईत काँग्रेसतर्फे आज (रविवार) दुपारी २ वाजता राजगृह (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान) ते चैत्यभूमी, दादर येथे भाववाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र सरकारची निष्क्रियता या विरोधात पदयात्रा काढण्यात येणार आहे.

Last Updated : Nov 14, 2021, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.