ETV Bharat / city

दिलासादायक! मुंबईत आज नव्या रुग्णांहूनही बरे झालेले रुग्ण अधिक; एकूण संख्या पोहोचली १,०५,८२९वर..

शहरात आतापर्यंत एकूण 77,102 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 22,800 अ‌ॅक्टिव रुग्ण आहेत. शहरातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 61 दिवस तर सरासरी दर 1.14 टक्के आहे.

1257 new covid-19 cases reported in mumbai on wednesday
मुंबईत आज नव्या रुग्णांहूनही बरे झालेले रुग्ण अधिक; एकूण संख्या पोहोचली १,०५,८२९वर..
author img

By

Published : Jul 23, 2020, 8:41 PM IST

मुंबई - मुंबईत आज कोरोनाचे 1,257 नवे रुग्ण आढळून आले असून 55 मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 5 हजार 829वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 5,927 वर पोहचला आहे. मुंबईत आज एकाच दिवशी 1,984 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज नोंद झालेल्या ५५ मृतांपैकी 37 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 38 पुरुष तर 17 महिला रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण 77,102 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 22,800 अ‌ॅक्टिव रुग्ण आहेत. शहरातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 61 दिवस तर सरासरी दर 1.14 टक्के आहे.

शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 625 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन घोषित करुन सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6,108 इमारती व इमारतीच्या विंग्स आणि काही मजले सील करण्यात आले आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी आतापर्यंत 4 लाख 56 हजार 511 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : ठाण्यातील कळवा रुग्णालयातून दोन कोरोना रुग्ण पळाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.