मुंबई - अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग संचालक ( Secondary and Higher Secondary Education Board ) यांनी 25 जुलै रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात ( 11th Online Admission Merit list ) आलेली आहे. यात एकूण उपलब्ध जागा दोन लाख 30 हजार 927 तर पहिल्या गुणवत्ता यादीसाठी एकूण कनिष्ठ महाविद्यालय प्राप्त विद्यार्थी आहेत दोन लाख 37 हजार 268 याचा अर्थ एकूण जागेपेक्षा जवळ जवळ 7 हजार 300 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. ही गुणवत्ता यादी आज ( 3 ऑगस्ट) रोजी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन आपल्याला कोणते कनिष्ठ महाविद्यालय दिले आहे. ते तपासून घ्यावे, म्हणजे त्यांचे प्रवेश सुनिश्चित होतील, असे शिक्षण उपसंचालक उपविभागीय मुंबई कार्यालायकडून कळवण्यात आले आहे.
11 वी प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर - महाराष्ट्र शासनाच्या वतीने माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्या आदेशानुसार मुंबई अर्थात एमएमआरडीए विभाग, पुणे (पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह ) नागपूर, अमरावती, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. अशी माहिती संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र शासन यांनी ईटीव्ही भारतला दिली.
दिलेल्या तारखेच्या नंतर ऑनलाईन प्रवेश नाही - विद्यार्थ्यांनी लॉगिन करायचे लॉगिन मध्ये गेल्यावर आपण स्वतः कोणते अकरावीसाठी अर्थात कनिष्ठ महाविद्यालय दिले गेले आहे. ते संकेतस्थळावर तपासावे. विद्यार्थ्यास पहिल्या पसंती क्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय जर दिले गेले असेल तर त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या काळातच आपला ऑनलाईन प्रवेश निश्चित करून घ्यावा. याचा अर्थ दिलेल्या तारखेच्या नंतर ऑनलाईन प्रवेश स्वीकारले जाणार नाही, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई संदीप संगवे यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे. विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या काळात प्रवेश निश्चित झाल्यावर किंवा पुढील म्हणजे दुसऱ्या फेरीच्या सूचनाबाबत संकेतस्थळावर जी माहिती प्रदर्शित केली जाईल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी पुढची कार्यवाही करावी विद्यार्थ्यांना ऑनलाइन कनिष्ठ महाविद्यालय अलर्ट झाले असल्यास व त्या कनिष्ठ महाविद्यालयास त्या विद्यार्थ्यांना प्रवेश पाहिजे असेल तर त्यांनी स्वतःच्या लॉगिन मध्ये जावे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास आपली सहमती पसंती द्यावी त्याचबरोबर प्रोसिड फॉर ऍडमिशन या पर्यायावर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर ऑनलाईन नोंदणी त्या ठिकाणी नोंदवावी.
कोटा प्रवेशाच्या संदर्भात महत्त्वाची सूचना - अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या बाबतीत नियमानुसार कोट्यातून देखील प्रवेश दिला जातो. त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे एक केंद्रीय स्तरावर ऑनलाइन, दुसरा प्रकार अल्पसंख्यांक, तिसरा प्रकार इन हाऊस इन हाऊस म्हणजेच ज्या शिक्षण संस्थेचे पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यालय होते आणि त्याच संस्थेचे अकरावी बारावी कनिष्ठ महाविद्यालय असेल तर त्याला म्हटलं जातं इन हाऊस. चौथा प्रकार आहे व्यवस्थापन कोटा प्रत्येक शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला काही एक विद्यार्थ्यांसाठीचा कोटा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. अशारीतीने सगळे प्रवेश निश्चित झाल्यावर खालील प्रमाणे सर्व फेऱ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा कोटा प्रतिबंधित केला जातो. अशी माहिती संदीप सांगवे शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
पहिल्या गुणवत्ता यादी चा सारांश खालील प्रमाणे - उपविभागीय शिक्षण संचालक मुंबई यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण उपलब्ध जागा दोन लाख 30 हजार 927 आहेत. पहिला गुणवत्ता यादीसाठी एकूण प्राप्त विद्यार्थी दोन लाख 37 हजार 268 याचा अर्थ एकूण जागेपेक्षा जवळ जवळ 7 हजार 300 विद्यार्थ्यांचे अर्ज जास्त प्राप्त झाले आहेत. पहिला गुणवत्ता यादीमध्ये एकूण कनिष्ठ महाविद्यालय दिले गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख 39 हजार 651, पहिल्या पसंती क्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 61 हजार 735, दुसऱ्या पसंती क्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 21 हजार 690, तिसऱ्या पसंती क्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 14 हजार 476 आहे.
कोणकोणत्या शाखेला किती जागा उपलब्ध आहे आणि किती विद्यार्थ्यांचे प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे, विज्ञानासाठी उपलब्ध विद्यार्थ्यांच्या जागा 74,680 तर प्रत्यक्ष 48 हजार 456 विद्यार्थ्यांनाच कनिष्ठ महाविद्यालय दिले गेले आहे. वाणिज्य या शाखेसाठी उपलब्ध विद्यार्थ्यांसाठीच्या जागा एक लाख वीस हजार 654 इतक्या आहेत तर त्यासाठी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय दिले गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 75 हजार 357 आहे. कला शाखेसाठी 32 हजार 280 विद्यार्थ्यांसाठी जागा आहेत तर प्रत्यक्ष 14 हजार 831 विद्यार्थ्यांना प्रवेश उपलब्ध झाली आहे. कौशल्य शिक्षणासाठी 3313 जागा उपलब्ध आहेत तर प्रत्यक्ष 17 विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय दिले गेलेले आहे.
विविध मंडळ निहाय किती विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय मिळाले पाहूया - एसएससी बोर्ड साठीचे एक लाख 27 हजार 45 विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले आहे तर सीबीएसई च्या 422 विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय दिले गेलेले आहे आय सी एस ई च्या संलग्न असलेल्या 6980 विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय दिले गेलेले आहे तर इंटरनॅशनल बोर्ड आंतरराष्ट्रीय मंडळ ज्याला म्हटलं जातं त्यातून दोन विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय दिले गेले आहे तसेच आय जी सी एस इ संलग्न असलेल्या 594 विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय दिले गेलेला आहे तर नॅशनल ओपन स्कूलच्या 104 विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय दिले गेलेले आहे आणि इतर अशा 704 विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय दिले गेलेले आहे या सर्वांची एकूण बेरीज एक लाख 39 हजार 651 इतकी आहे.
हेही वाचा - MLA Uday Samant: उदय सामंत यांनी नियोजीत मार्ग का बदलला?, राजकीय चर्चांना उधान; वाचा सविस्तर