ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 1,128 नवे रुग्ण तर 66 जणांचा मृत्यू - मुंबई शहर बातमी

मुंबई शहर परिसरात आज (सोमवार) कोरोनाचे 1,128 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 67,635 वर पोहोचला आहे.

mumbai corona updates
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 22, 2020, 10:34 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा राज्यतही प्रसार होते आहे. त्यातही मुंबई शहर हे जणू कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याचे दिसत आहे. मुंबईत आज (सोमवार) कोरोनाचे 1,128 नवीन रुग्ण आढळून आले असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 67,635 वर पोहचला आहे, तर मृतांचा आकडा 3735 वर पोहचला आहे. मुंबईत आतापार्यंत 34,119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या मुंबईत 29781 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत नव्याने 1242 रुग्ण आढळले तर 66 जणांचा मृत्यू झाला. 66 पैकी 20 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर, 46 मृत्यू 19 जून पूर्वीचे आहेत. 66 मृत्यूपैकी 40 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 41 पुरुष आणि 25 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 3 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 33 जणांचे वय 60 वर्षावर तर 30 जणांचे वय 40 ते 60 वर्षांदरम्यान होते.

हेही वाचा... देशात सर्वाधिक कोरोना चाचणी प्रयोगशाळा महाराष्ट्रात, आतापर्यंत 7 लाखहून अधिक नमुन्यांची तपासणी

मुंबईमधून आज 628 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 34,119 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा एकूण आकडा 67,635 वर पोहोचला आहे. त्यापैकी 3,735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 34,119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचे 29,781 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती मुबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 15 ते 21 जूनपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.88 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दर वाढीचा दर 37 दिवसांवर पोहचला आहे.

हेही वाचा... कोरोना टेस्टबाबत राज्य सरकारचा दुजाभाव, किरीट सोमय्यांचा आरोप

महाराष्ट्रात आज 3721 नवे कोरोना रुग्ण...

राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना आज 3721 नवीन रुग्णांचे निदान आज झाले आहे. सध्या राज्यात 61 हजार 793 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज राज्यातील 1962 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या 67 हजार 706 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 7 लाख 78 हजार 419 नमुन्यांपैकी 1 लाख 35 हजार 796 नमुने पॉझिटिव्ह (17.24 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 1 हजार 182 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, सध्या 26 हजार 910 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 62 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात मुंबई मनपा 20, कल्याण डोंबिवली मनपा 1, उल्हासनगर मनपा 1, मीरा-भाईंदर मनपा 13, पालघर 1, मालेगाव मनपा 8, पुणे 1, पुणे मनपा 9, पिंपरी-चिंचवड मनपा 1, औरंगाबाद 1, औरंगाबाद मनपा 3, लातूर 1, तर, अकोला मनपा येथील दोघांचा समावेश आहे.

आज राज्यात एकूण नोंदविलेल्या 113 मृत्यूंपैकी 62 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत आणि 51 मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील 46, वसई विरार -2, रायगड -2 व कल्याण डोंबिवली 1 यांचा समावेश आहे. हे 51 मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा... आता मुख्य लक्ष्य मृत्यूदर कमी करण्याकडे - डॉ. शशांक जोशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.