मुंबई - राज्यभरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांमधील कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. राज्य पोलीस दलातील १०६१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये ११२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामधील १७४ कर्मचारी पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तसेच एकूण बाधितांपैकी आजवर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्रालयाने यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.
-
1061 personnel of Maharashtra Police including 112 police officers have been tested positive for #COVID19 so far. Out of the total infected police personnel, 174 have been cured while 9 others lost their lives: Maharashtra Police pic.twitter.com/HgNkrDBpeZ
— ANI (@ANI) May 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">1061 personnel of Maharashtra Police including 112 police officers have been tested positive for #COVID19 so far. Out of the total infected police personnel, 174 have been cured while 9 others lost their lives: Maharashtra Police pic.twitter.com/HgNkrDBpeZ
— ANI (@ANI) May 15, 20201061 personnel of Maharashtra Police including 112 police officers have been tested positive for #COVID19 so far. Out of the total infected police personnel, 174 have been cured while 9 others lost their lives: Maharashtra Police pic.twitter.com/HgNkrDBpeZ
— ANI (@ANI) May 15, 2020
आता पर्यंत राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 174 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 22 अधिकारी व 152 अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 878 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 90 पोलीस अधिकारी व 878 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 7 हजार 256 गुन्हे नोंदवण्यात आले असून 672 जणांवर क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलीय.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या 229 घटना घडल्या असून यामध्ये 803 जणांना अटक करण्यात आली आहे. कोविड-19 च्या संदर्भात पोलीस नियंत्रण कक्षावर तब्बल 91 हजार 790 फोन आले आहेत. तसेच अवैध वाहतुकीच्या एक हजार 304 प्रकरणात 58 हजार 291 वाहन जप्त करण्यात आली आहेत. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडिकल स्टाफ वर 34 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 85 पोलीस कर्मचारी देखील विविध हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत.