ETV Bharat / city

Fish In Rainy Season : पावसाळ्यातही मुंबईकरांना मिळणार माशांच्या आस्वादाचा आनंद; कसे ते वाचा? - पावसाळ्यात मिळणार मासे

पावसाळ्याच्या काळात मासेमारीला बंदी असल्याने मच्छीमार बांधव समुद्रात जात ( Fish In Rainy Season ) नाहीत. मात्र, दरम्यानच्या काळात मासे खाण्याची भूक भागवण्यासाठी १०० टन मासे वातानुकूलित गोदामांमध्ये फ्रिजन केले असल्याची ( Fish Frozen Air Conditioned Warehouses In Mumbai ) माहिती मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली आहे.

Fish
Fish
author img

By

Published : Jun 17, 2022, 6:54 PM IST

मुंबई - पावसाळ्याच्या काळात मासेमारीला बंदी असल्याने मच्छीमार बांधव समुद्रात जात नाहीत. मात्र, दरम्यानच्या काळात मासे खाण्याची भूक भागवण्यासाठी १०० टन मासे वातानुकूलित गोदामांमध्ये फ्रिजन ( Fish Frozen Air Conditioned Warehouses In Mumbai ) केले असल्याची माहिती मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली ( Fish In Rainy Season ) आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत माशांचा प्रजननाचा काळ मानला जातो. तसेच, समुद्रही खवळलेला असतो, म्हणून या कालावधीत सुमारे दोन महिने मासेमारी बंद ठेवली जाते. यंदाही एक जून 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे. या कालावधीत मासेमारीसाठी एकही बोट समुद्रात जात नसल्यामुळे विविध प्रकारचे मासे मे महिन्याच्या अखेरीस वातानुकूलित गोदामांमध्ये साठवून ठेवले जातात. त्यामुळे मत्स्य खवय्यांसाठी ताजी मासळी जरी मिळत नसली, तरीही फ्रीजन केलेली मासोळी मासे खाणाऱ्यांना या दोन महिन्यात मिळणार आहे.

मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे माहिती देताना

कुठे आहेत वातानुकूलित गोदाम? - नवी मुंबई लगतच्या तळोजा येथे वातानुकूलित गोदामे आहेत. तर, रत्नागिरी गुजरात आणि हावडा येथे प्रत्येकी एक वातानुकूलित गोदाम आहे. या गोदामांमध्ये पापलेट, हलवा, कोळंबी, सुरमई बांगडा, रावस, वाम, दाताळ, फळई, कोती, घोळ इत्यादी माशांची साठवणूक केली जाते. वातानुकूलित गोदामात साठवून ठेवलेले मासे किमान आठ महिने ताजे राहतात, असा दावा संधे यांनी केला आहे.

'सध्या फ्रीझन मधील मासेमासळी बाजारात' - काही अपवाद वगळता सध्या मोठ्या प्रमाणात वातानुकूलित गोदामात साठवलेले मासे विक्रीसाठी येत आहेत. यापूर्वी तेलंगणा, आंध्र, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये 16 एप्रिल ते 16 जून या कालावधीत प्रजननासाठी मासेमारी बंद करण्यात आली आहे. 17 जून पासून या राज्यात मासेमारी सुरू होणार आहे. या राज्यांमध्ये मासेमारी अधिक झाल्यास मुंबई-पुण्यातील मत्स्य खवय्यांना ताजी मासळी मिळेल, असा दावाही संधे यांनी केला.

'वातानुकुलित गोदामावर अमराठी भांडवलदारांची मक्तेदारी' - मासळी साठवण्यासाठी आवश्यक असलेल्या वातानुकूलित गोदामावर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान फारसे मिळत नसल्याने अमराठी भांडवलदारांची मक्तेदारी अधिक दिसून येत असल्याचे मत्स्य व्यावसायिक पांडुरंग टिळे यांनी सांगितले. रत्नागिरीतील गद्रे वगळता एकाही मराठी माणसाच्या मालकीचे वातानुकूलित गोदाम नाही. दोन मराठी बांधवांनी असा प्रयत्न केला. पण, अन्य भांडवलदारांनी त्यांचा या व्यवसायात टिकाव लागू दिला नाही, अशी खंतही टिळे यांनी व्यक्त केली.

'माशांची चीनला निर्यात' - मोठ्या मत्स व्यावसायिकांकडून अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर पालघर, रत्नागिरी, डहाणू, मुंबई आणि सिंधुदुर्ग या पट्ट्यातील दर्जेदार मासळी चीनला निर्यात केली जाते. याच मासोळीला आकर्षक पॅकिंग करून चीन आपल्या नावावर बाजारात खपवते. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मासळी आयात करून ही मासळी स्वतःच्या नावावर जगाच्या बाजारात उतरवत चीन मासेमारीत पहिल्या क्रमांकाचा देश असल्याचे भासवून दिले जात आहे. मात्र, केंद्र सरकारने या विरोधात कधीही आक्षेप घेतला नसल्याचे टिळे यांनी सांगितले.

हेही वाचा - Mumbai Rain : मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.