ETV Bharat / city

MSRTC Ticket Hike: दिवाळीच्या दिवसांत आता एसटीची 10 टक्के भाडेवाढ!

author img

By

Published : Oct 15, 2022, 12:16 PM IST

Updated : Oct 15, 2022, 12:38 PM IST

एसटी कडून (maharashtra state transport) दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांकडून 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. (MSRTC bus ticket hike). ही भाडेवाड 31 ऑक्टोबर पर्यत लागू राहील.

ST Bus
ST Bus

मुंबई: एसटी महामंडळाच्या (maharashtra state transport) परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. (MSRTC bus ticket hike). त्यानूसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांकडून 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड 31 ऑक्टोबर पर्यत लागू राहील.

शिवनेरी व अश्वमेध सेवेला भाडेवाढीतून वगळले: सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशांकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक वसूल करण्यात येईल. ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू असणार नाही. 1 नोव्हेबर पासून ही भाडेवाढ संपुष्टात येऊन नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Last Updated : Oct 15, 2022, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.