ETV Bharat / city

चंद्रावर बोलून बस्स झाले आता लातूरच्या विकासाबद्दल बोला...चाकूरकरांची भरसभेत गोची - सचिन पायलट

४५ मिनिट झाल्यानंतरही सचिन पायलट वेळेवर पोहचले नाही म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांनी भाषण सुरुच ठेवले. एवढ्यात उपस्थित महिलांमधील एकीने चंद्रावर बोलून बस्स झाले, आता लातूरच्या विकासाबाबत बोला असे सांगितले.

शिवराज पाटील-चाकूरकर यांचे भाषण
author img

By

Published : Apr 10, 2019, 3:23 PM IST

लातूर - येणार...येणार म्हणून सभेच्या निर्धारित वेळेच्या केवळ १० मिनिट अगोदर राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे लातूर येथील सभास्थळी आगमन झाले. मात्र, दरम्यान व्यासपीठावर भाषण करत असलेल्या माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची चांगलीच गोची झाली.

शिवराज पाटील-चाकूरकर यांचे भाषण

लातूर येथे मंगळवारी रात्री काँग्रेसची सभा पार पडली. या सभेसाठी राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित राहणार होते. मात्र, नांदेडहून येण्यास त्यांना उशीर झाला होता. दरम्यान, व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. शेवटच्या टप्प्यात माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे मनोगत व्यक्त करण्यास उभे राहिले. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास सांगत त्यांनी या प्रगतीमध्ये काँग्रेसची भूमिका किती महत्वाची राहिली आहे, हे पटवून दिले. ४५ मिनिट झाल्यानंतरही सचिन पायलट वेळेवर पोहचले नाही म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांनी भाषण सुरुच ठेवले.

एवढ्यात उपस्थित महिलांमधील एकीने चंद्रावर बोलून बस्स झाले, आता लातूरच्या विकासाबाबत बोला असे सांगितले. त्यामुळे एकच हशा पिकला. याप्रकारानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी इतरांना बोलविण्यात आले. सभा संपण्यास केवळ १० मिनिटांचा अवधी बाकी असताना सचिन पायलट यांचे आगमन झाले. पायलट यांनी कमी वेळात भाषण करताना सरकारवर टीका करत मोदींना हटवण्याचे आवाहन केले. सभेला आमदार अमित देशमुख, मच्छिद्र कामंत, मोईन शेख यांच्यासह अनेकजणांची उपस्थिती होती.

Intro:काँग्रेसच्या सभेत चाकूरकरांची गोची ; उपस्थितांमध्ये हशा
लातूर : येणार...येणार म्हणून सभेच्या निर्धारित वेळेच्या केवळ 10 मिनिट अगोदर राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री मंत्री सचिन पायलट यांचे लातूर येथील सभास्थळी आगमन झाले. मात्र, दरम्यान व्यासपीठावर भाषण करीत असलेले माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची चांगलीच गोची झाली. सभा संपण्यास काही मिनिटांचाच अवधी राहिल्याने प्रमुख म्हणून उपस्थित राहणारे सचिन पायलट यांच्या वाटेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. दरम्यान, 45 मिनिट भाषण करून झाल्यानंतर आता सचिन पायलट अजून आले नसल्याने बोलत असल्याचे चाकूरकर यांनी स्पष्टही केले. एवढेच नाही तर मनोगतामध्ये त्यांनी देश स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंतच्या होत असलेल्या प्रगतीचे दाखले दिले. एवढे होऊन उपस्थित महिलेने चांद्रवरचे राहू द्या अगोदर सर्वसामान्यांच्या सोईचे बघा असा सवालही केला त्यामुळे चाकूरकर यांची चांगलीच अडचण झाली.

Body:लातूर येथे मंगळवारी रात्री काँग्रेसची सभा पार पडली. या सभेसाठी राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित राहणार होते. मात्र, नांदेडहून येण्यास त्यांना उशीर झाला होता. दरम्यान, व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. शेवटच्या टप्प्यात माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे मनोगत व्यक्त करण्यास उभे राहिले. स्वतंत्र्यानंतरचा इतिहास सांगत त्यांनी या प्रगतीमध्ये काँग्रेसची भूमिका किती महत्वाची राहिली आहे हे देखील पटवून दिले. 45 मिनिट उलटल्यानंतरही ही सचिन पायलट वेळेवर पोहचले नसल्याने भाषणाचा रापटा शिवराज पाटील चाकूरकर यांनी सुरूच ठेवली. एवढ्यात उपस्थीत महिलांमधील एकीने चांद्रवर बोलून बास झाले..आता लातूरच्या विकासाबाबत बोला असं सांगितलं. त्यामुळे एकाच हशा पिकला. आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी इतरांना बोलविण्यात आले. सभेला केवळ 10 मिनिटांचा अवधी असताना सचिन पायलट यांची उपस्थिती लाभली. कमी वेळातही त्यांनी सरकारवर टीका करून मोदी सरकार हटीवण्याचे आवाहन केले.

Conclusion:तत्पूर्वी आ.अमित देशमुख, मच्छिद्र कामंत, मोईन शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.