ETV Bharat / city

Kolhapur Police हे कोल्हापूर आहे इथं असला धिंगाणा चालत नाही, अश्लील डान्स करणाऱ्यांसह आयोजकावर गुन्हा दाखल - लक्ष्मीपुरी पोलीस कोल्हापूर

कोल्हापुरातील शुक्रवार पेठ shukrwar peth kolhapur परिसरातील पंचगंगा तालीम मंडळाच्या एका कार्यक्रमाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये काही तृतीयपंथी Tritiyapanthi in Kolhapur अश्लील हावभाव करून, गर्दीमध्येच सिगारेट ओढत Smoking a cigarette अक्षरश धिंगाणा घालताना पाहायला मिळाले.

Dance Obscenely On DJs
अश्लिल डान्स करत धिंगाणा
author img

By

Published : Aug 17, 2022, 10:32 AM IST

Updated : Aug 17, 2022, 10:58 AM IST

कोल्हापुरातील शुक्रवार पेठ shukrwar peth kolhapur परिसरातील पंचगंगा तालीम मंडळाच्या एका कार्यक्रमाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये काही तृतीयपंथी Tritiyapanthi in Kolhapur अश्लील हावभाव करून, गर्दीमध्येच सिगारेट ओढत Smoking a cigarette अक्षरश धिंगाणा घालताना पाहायला मिळाले. त्यानंतर बघता बघता याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर संबंधितांवर कारवाईची मागणी सुरू होताच मंगळवारी सायंकाळी संबंधित तृतीयपंथीयांसह संयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कोल्हापूर आहे इथं असला धिंगाणा चालणार नाही असे म्हणत अनेकांनी कारवाईची मागणी केली आणि संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ परिसरातील एका मिरवणुकीत अनेक तृतीयपंथी नशा करत डिजेच्या गाण्यावर अश्लील हावभाव करून धिंगाणा घालत असल्याचा व्हिडीओ समोर आला. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तृतीयपंथी लोक त्यांच्या धार्मिक विधी साठी येथील पंचगंगा नदीच्या घाटावर आले होते. याच वेळी पंचगंगा तालीम मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी रस्त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता डीजे लावून मिरवणूक काढली. हा सर्व संतापजनक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या फोटो समोर होत होता. शिवाय यामुळे या व्हायरल व्हिडीओ नंतर अनेकांनी आक्षेप नोंदवला. या व्हिडिओ विरोधात शिवसेना शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांनी सुद्धा कारवाईची मागणी केली. डीजेच्या तालावर काही तृतीयपंथी चंद्रमुखी गाण्यावर सिगारेट ओढत अश्लील हावभाव करत धिंगाणा घालत असल्याचे दिसून आले. शिवाय डीजेच्या बाजूला पंचगंगा तालीम मंडळ शुक्रवार पेठ असे लिहिले असून या दोन्ही बाजूला छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचे फोटो लावण्यात आले आहेत. डीजेच्या तालावर धांगडधिंगा घालत, सिगरेट ओढणे आणि गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि शाहूप्रेमींनी संताप व्यक्त केला. दरम्यान, याची गंभीर दखल घेत लक्ष्मीपुरी पोलीसांनी Laxmipuri Police Kolhapur संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

हे कोल्हापूर आहे इथं असला धिंगाणा चालत नाही 'त्या' अश्लील डान्स करणाऱ्यांसह आयोजकावर गुन्हा दाखल

यांच्यावर गुन्हा दाखल 4 ते 5 अनोळखी तृतीयपंथी प्रकाश अनामद्राव गवंडी राकेश रंगराव पोवार सलमान रियाज बागवान नितीन बाळासो साळी किरण प्रकाश साठम यांच्यासह अन्य 10 अनोळखी आशा एकूण 18 ते 19 जणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूरात डीजेच्या ठेक्यावर तरुणींचा सिगारेट ओढत अश्लिल डान्स करत धिंगाणा

हेही वाचा Police Woman Suicide महिला पोलिसाने पोलीस ठाण्यातच घेतला गळफास, जाणून घ्या आत्महत्येचे कारण

Last Updated : Aug 17, 2022, 10:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.