कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात दोन महिला चोरांनी भक्तांच्या पर्सवर डल्ला मारल्याचे (Two female thieves stolen purse) सीसीटीव्हीत कैद झाले आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, संबंधित महिला भाविकाने तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षामध्ये सीसीटीव्ही तपासले असता दोन महिला चोरी (Kolhapur Ambabai temple purse Theft) करताना निदर्शनास आल्या. (Kolhapur Crime) (Latest news from Kolhapur)
10 मिनिटात लावला चोरीचा छडा- देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या मदतीने या महिलांना तात्काळ रंगेहात मुद्देमालासहित ताब्यात घेण्यात आले. अवघ्या दहा मिनिटात या गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मंदिर पोलिस इन्चार्ज राजेंद्र कांबळे, पोलीस सहाय्यक फौजदार नंदिनी मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल देवानंद बल्लारी, देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभाग प्रमुख राहुल जगताप, अवधूत चौगुले, अनिकेत बागल व सेक्युरिटी रोहित आवळे, गोसावी यांच्या साहाय्याने हा गुन्हा उलगडण्यात मदत झाली.