कोल्हापूर : कोल्हापूरात पुन्हा एकदा दोन गवे (Two Bison entered Kolhapur) शिरले आहेत. येथील सीपीआर चौकातून गवा जयंती नाल्याच्या दिशेने जाताना दिसला. तसेच नागाळा पार्क, विवेकानंद कॉलेज परिसरात देखील गवा फिरताना काहींनी आपल्या कॅमेरात कैद केले आहे. दोन गव्यांनी शहरात प्रवेश केल्याने आता शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागासह आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
गवा शहरातून गेला नैसर्गिक अधिवासात :
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूरात एक पूर्ण क्षमतेने वाढलेला गवा शिरला होता. त्याला वनविभागाने पुन्हा एकदा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले होते. मात्र आज पुन्हा एकदा दोन गवे शहरात पाहायला मिळाले आहेत. पण हे दोन्ही गवे लहान असून त्यांना सुद्धा वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
भुयेवाडीतील एकाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू :
दोन दिवसांपासून येथील भुयेवाडीतील 24 वर्षीय युवकाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. शिवाय दोघांना गंभीर जखमी सुद्धा केले होते. मात्र पुन्हा एकदा अशी घटना घडू नये यासाठी वनविभागाने सुद्धा खबरदारी घेतली असून सकाळपासूनच गव्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - Miss Universe 2021: 'मिस युनिव्हर्स' हरनाझ संधू मायदेशी परतली, मुंबईत जोरदार स्वागत