ETV Bharat / city

ST Workers Strike : कोल्हापूरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प - लालपरी

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहेच. मात्र, त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सुद्धा मुद्दा आहे.

ST Workers Strike
ST Workers Strike
author img

By

Published : Nov 8, 2021, 8:58 PM IST

कोल्हापूर : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभरासह कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा संप पुकारला आहे. आज (सोमवारी) सकाळपासून कोल्हापूर डेपोमधील बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असाही निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले. नेमकं काय म्हणणे आहे या कर्मचाऱ्यांचे आणि आज कोल्हापूर बसस्थानकावर काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

कोल्हापूरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प

अन्यथा कर्मचाऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागेल
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहेच. मात्र, त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सुद्धा मुद्दा आहे. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र शासनाकडून काहीही दखल घेतली नसल्याने संपाचे हत्यार उपसण्याची वेळ आल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. शासनाने आता तरी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कर्मचाऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले असा इशारा सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.

ST Workers Strike
कोल्हापूर बस डेपो
एसटी महामंडळाला लाखोंचा फटका : आज (सोमवारी) सकाळपासूनच कोल्हापूरातील एसटी कर्मचारी आंदोलनात उतरले असून येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेणार नसून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सकाळपासून वाहतूक ठप्प झाली असून महामंडळाला लाखोंचा फटका बसला आहे. दरम्यान आजच्या या संपाला कोल्हापूरातील भाजपने सुद्धा पाठिंबा दिला असून सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी मागणी केली आहे. हेही वाचा - पंढरीची वारी ही स्त्री पुरुष समानतेचे प्रतिक - नरेंद्र मोदी, पालखी महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.