कोल्हापूर - राज्य सरकारच्या विरोधात कोल्हापुरातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 'लॉकडाउन हटवा व्यापारी वाचवा, ही टॅगलाईन घेऊन उद्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील व्यापारी रस्त्यावर उतरणार आहेत. व्यापार करण्यास सायंकाळी सहा वाजेपर्यंत परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी कोल्हापुरातील व्यापारी आपआपल्या दुकानासमोर दहा ते बारा या वेळेत दुकाने बंद ठेवून तीव्र निदर्शने करणार आहेत. अशी माहिती कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना केवळ सात ते दोन या वेळेत व्यापार करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र याला कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने निर्बंध शिथील करून व्यापाऱ्यांना सहा वाजेपर्यंत व्यापार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापुरातील व्यापारी संघटनेने केली आहे. त्यासंदर्भात आज जिल्ह्यातील 43 व्यापारी संघटनांची बैठक पार पडली.
लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा.. बुधवारी कोल्हापुरात व्यापाऱ्यांचे आंदोलन - कोल्हापुरात व्यापाऱ्यांचे आंदोलन
व्यापार करण्यास सायंकाळी सहा वाजेपर्यंत परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी कोल्हापुरातील व्यापारी आपआपल्या दुकानासमोर दहा ते बारा या वेळेत दुकाने बंद ठेवून तीव्र निदर्शने करणार आहेत. अशी माहिती कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.