कोल्हापूर लोकमान्य टिळक यांनी समाज एकत्र यावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची Ganeshotsav 2022 सुरुवात केली. यामुळे गल्लोगल्ली मोठ्या जल्लोषात गणपतीची स्थापना होत, गणेशोत्सव साजरा होऊ लागला. यामुळे समाज एकत्र आलाच, मात्र दुसऱ्या बाजूला कुंभार समाजाला देखील रोजगार मिळाला. कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहणारे कुंभार कुटुंब family has been making Ganesha idols, गेल्या तीन पिढ्यांपासून म्हणजे तब्बल 60 making Ganesha idols for the past 60 years वर्षापासून गणपती मूर्ती तयार करण्याचे काम करते आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरातील बहुतांश मंडळे ही गेली कित्येक वर्षांपासुन, केवळ त्यांच्याकडूनच मूर्ती खरेदी करत असतात.
दसऱ्यापासून सुरू असते मूर्ती बनवण्याचे काम कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात कुंभार कुटुंबीय राहतात. प्रसिद्ध मूर्तिकार के आर कुंभार यांची ही तिसरी पिढी. के आर कुंभार हे पोटली गणपती पहिल्यांदा कोल्हापुरात घेऊन आले. पोटली गणपतीचा अर्थ मोठे पोट असलेला. कुंभार कुटुंबिय मूर्ती बनविण्याचे काम दसऱ्यापासून सुरू करत आणि हे काम बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशीपर्यंत सुरू असते. यामध्ये संपूर्ण कुटुंब हे मन झोकून काम करतात. अत्यंत सुबक आणि पाहता क्षणी नजरेत भरणाऱ्या या मूर्ती घडवतांना त्या मूर्तिकारांना देखील वेगळीच ऊर्जा असते.
80% मंडळ घेतात येथूनच मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार कुटुंब फक्त आणि फक्त मंडळांसाठी मूर्ती तयार करतात. तर कोल्हापुरातील 80% मंडळ देखील कुंभार यांच्याकडूनच गणेश मूर्ती घेत असतात. कुंभार कुटुंबानी आपली वेगळीच ओळख जपली आहे. मूर्ती वजनास अत्यंत हलकी, मात्र आकाराने मोठे आणि पाहत्या क्षणी नजरेत भरणारी असते. गणेश मूर्ती घडवतांना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बाप्पाचे डोळे. मूर्ती पाहताच बाप्पा आपल्याकडे बघत आहे, अशी भावना प्रत्येक भक्तामध्ये निर्माण होण्यासाठी ते डोळे तयार करणे मोठ्या जोखमीचे असते आणि हे काम के आर कुंभार यांची तिसरी पिढी करत आहे. शुभम कुंभार यांचे MBA चे शिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र नोकरी न करता, ते आपल्या पारंपरिक व्यवसायाकडेच लक्ष देत आहे. त्यांच्या आजोबांनी शिकवलेली कला आणि त्यांचा आशीर्वाद जपत भविष्यात आणखी नवीन काही प्रयोग करता येतील का, यालर त्यांचे सदैव लक्ष असते.
घरापासून मिरवणूक काढण्याची परंपरा के आर कुंभार यांचे 2020 ला निधन झाले. मात्र अण्णांनी पहिला गणपती तयार केला, तो म्हणजे रंकाळावेशाचा. त्याची परंपरा अशी आहे की, त्याची मिरवणुकीची सुरुवात ही कुंभार यांच्या दारातून होत असते आणि तो गणपती त्यांच्या गल्लीतून गेल्याशिवाय कोणी जेवत सुद्धा नाही, अशी माहिती उदय कुंभार यांनी दिली. त्यावेळी अण्णांची फार आठवण येत असल्याचे ही, त्यांनी म्हंटले आहे. दरवर्षी मिरवणुकीचे उद्घाटन अण्णांच्या हस्तेच होत असे, मात्र आता ती जबाबदारी त्यांच्या पुढच्या पिढीवर आली आहे.