कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी गेल्या दहा दिवसापासून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करत ( Swabhimani Shetkari Sanghatana agitation ) आहेत. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा आज अकरावा ( Raju Shetti agitation in Kolhapur ) दिवस आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे. चुकीचे वीज बिल दुरुस्त ( Correction in electricity bill ) करून मिळाली पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी राजू शेट्टी हे धरणे आंदोलन ( Swabhimanis demands for power bills ) करत आहेत. मात्र, या आंदोलनाची दखल अद्याप सरकारने घेतलेली नाही.
हेही वाचा-Special Shahi Pheta For PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला बनवला 'राजबिंडा शाही फेटा'
रस्त्यावर दुर्तफा रांगा-
दोन दिवसांपूर्वी आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर करण्यात आला होता. त्याप्रमाणे आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी रत्नागिरी कोल्हापुर महामार्ग हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला आहे. जोरदार घोषणाबाजी करत गेल्या अर्धातासापासून हे आंदोलन सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा-Ajit Pawar On OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकारप्रमाणे विधेयक मांडणार - अजित पवार
बारावीच्या परीक्षेमुळे आंदोलनाच्या वेळेत बदल
जिल्ह्यात एकूण 35 ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. आजपासून बारावीच्या पेपर सुरू झाले असल्याने राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना गुरुवारी रात्री आवाहन करत आंदोलन हे ११ नंतरच करण्यास सांगितले होते. तसेच एखादा विद्यार्थी परीक्षेला जाण्यास विलंब झाला तर त्यांना स्वतः कार्यकर्त्यांनी परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राजू शेट्टी यांनी दिली होती. यामुळे बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर साडेअकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले.
हेही वाचा-Bomb Blast in Peshawar Mosque : पेशावर येथील मशिदीत बॉम्बस्फोट; 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
राजू शेट्टींचा उर्जा मंत्र्यांना टोला
मागील 11 दिवसांपासून कोल्हापूरच्या महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याचा निर्णय झाला नाही तर 4 मार्चपासून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. मात्र, आंदोलन सुरू झाल्यापासून या आंदोलनास फक्त दोन मंत्री आणि दोन आमदारांनी भेट दिली होती. मात्र, शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. यापुढे मंत्री, आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार, असाही इशाराही राजू शेट्टी यांनी यापूर्वी दिला होता. ऊर्जा मंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी. विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन, असा टोला शेट्टी यांनी लगावला होता.