ETV Bharat / city

येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उडवणारा - राजू शेट्टी - Swabhimani Shetkari Sanghatana

कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. या जिल्ह्यात गोकुळ ही शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. या संस्थेवर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांचाही तितकाच अधिकार आहे मग याठिकाणी शेतकऱ्यांचाच प्रतिनिधी संचालक म्हणून का नको असा सवाल यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

raju shetty
राजू शेट्टी
author img

By

Published : Mar 3, 2021, 7:06 PM IST

Updated : Mar 3, 2021, 7:50 PM IST

कोल्हापूर - देशामध्ये महागाईने सर्वसामान्य नागरिक हैरान झाले आहेत. अनेकांना जीवन जगणंही अवघड बनले आहे. पेट्रोल डिझेलचे दर तर गगनाला भिडले आहेत. शिवाय गॅसचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हमीभावाच्या बाबतीतही तेच, शिवाय एक मार्चपासून रासायनिक खतांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा आता झळा बसू लागल्या आहेत, म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उडवणार असल्याची घोषणा केली आहे. स्वतः संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

विजबिलावरून राज्य सरकारला सवाल

यावेळी पत्रकार परिषदेत माजी खासदार शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीजबिल माफ करायला सरकारला काय अडचण होती? केंद्र सरकारवर आमची नाराजी असली तरी राज्य सरकारचे कामकाजही फार समाधानकारक नाही. राज्य सरकारसुद्धा शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिल्याचे चित्र दिसत नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले. शिवाय कोणत्याही परिस्थितीत या सर्वच प्रश्नांना न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही म्हणत लवकरच आंदोलनाचा भडका उडवणार असून याबाबत व्ह्यूवरचना सुद्धा आठवडाभरात आखली जाणार असल्याचे त्यांनी म्हंटले.

गोकुळमध्ये शेतकरी प्रतिनिधी का चालत नाही?

कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. या जिल्ह्यात गोकुळ ही शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. या संस्थेवर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांचाही तितकाच अधिकार आहे मग याठिकाणी शेतकऱ्यांचाच प्रतिनिधी संचालक म्हणून का नको असा सवाल सुद्धा यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

संदीप कारंडे यांचा स्वाभिमानीमध्ये प्रवेश

हातकणंगले येथील शिवसेना कार्यकर्ते संदीप कारंडे आणि भाजप प्रवक्ते रामदास कोळी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला. येथील शासकीय विश्रामगृह येथे राजू शेट्टी यांनी छातीवर स्वाभिमानीची निशाणी 'लाल बिल्ला' लावून त्यांचा पक्षात प्रवेश केला. यावेळी दोघांचेही शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Last Updated : Mar 3, 2021, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.