ETV Bharat / city

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन १५ दिवस स्थगित; सरकारने फसवल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा - raju shetti agitation in kolhapur

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी तसेच चुकीची वीज बिल दुरुस्त करून मिळावी यासाठी गेल्या १४ दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन (Swabhimani Shetkari Sanghatana) सुरू केले होते. आज अखेर पंधरा दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले आहे.

raju shetti agitation
राजू शेट्टींचे आंदोलन स्थगित
author img

By

Published : Mar 8, 2022, 4:31 PM IST

Updated : Mar 8, 2022, 7:47 PM IST

कोल्हापूर - शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी तसेच चुकीची वीज बिल दुरुस्त करून मिळावी यासाठी गेल्या १४ दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन (Swabhimani Shetkari Sanghatana) सुरू केले होते. आज अखेर पंधरा दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले आहे. काल मुंबई येथे मंत्रालयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सरकारला १५ दिवसाचा अल्टिमेटसुद्धा देण्यात आला आहे.

राजू शेट्टी - अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

आंदोलन स्थगित केले असले तरी पुढील १५ दिवसात राजू शेट्टी राज्यभर दौरा करणार असून, सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज कशी मिळू शकते याची जनजागृती करणार आहेत. तसेच वीज बिल दुरुस्तीसाठी राज्यात सर्वत्र महावितरणकडून विशेष कॅम्प लावले जाणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. मात्र, या अगोदर देखील सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर पुढे काहीच झाले नसल्याने आता सरकारवर विश्वास राहिला नाही, यामुळे या आंदोलनाचा दुसरा टप्पा ही त्यांनी जाहीर केला आहे. तर 2 टप्प्यात एफ आर पी देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

राजू शेट्टींचे आंदोलन १५ दिवस स्थगित:

शेतकरी वीज प्रश्नांवर कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. याप्रश्नी सोमवारी मुंबई येथे उर्जामंत्री राऊत व शेट्टी यांच्यात चर्चा झाली. तब्बल दीड तास चाललेल्या बैठकीनंतर उर्जामंत्र्यांनी एका आयआयटीच्या समितीमार्फत अभ्यास करण्यासाठी १५ दिवसाची मुदत मागितली आहे. तसेच आंदोलन १५ दिवस थांबविण्याची विनंतीही नितीन राऊत यांनी केली होती. सर्व काही सकारात्मक चर्चा झाल्याने आज राजू शेट्टी कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर सर्वांसोबत चर्चा करून हे आंदोलन १५ दिवस स्थगित केले आहे. मात्र शेतकऱ्याना १० तास वीज मिळावी ही मुख्य मागणी शेतकरी संघटनेची आहे मात्र एम ए आर सी च्या आदेशानुसार दिवसाला फक्त ८ तास वीज द्याची असेल तर अगोदर त्यांची परवानगी घ्यावी लागते. यामुळे या आठवड्यात ८ तासा ऐवजी १० तास वीज मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

वीज बिल दुरुस्तीसाठी तालुका स्तरावर कॅम्प:

आंदोलकांची दुसरी मागणी ही चुकीची वीज बिल तातडीने दुरुस्त करून मिळावी अशी होती. या प्रमाणे काल झालेल्या बैठकीत तालुका स्तरावर वीज बिल दुरुस्तीसाठी विशेष कॅम्प घेणार असल्याचे आणि या सर्वांवर नजर ठेवण्यासाठी राज्य पातळीवर अधिकारी नेमणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी मान्य केले आहे. मात्र, या सरकारवर विश्वास नाही या अगोदर ही सरकारने फसवले असल्याने शेतकरी संघटनेने प्लॅन बी तयार केले असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. उद्यापासून पुढील १५ दिवस राज्यभर मेळावे, पत्रकार परिषद घेऊन दिवसा वीज कशी शक्य आहे आणि शेतकऱ्यांचा हक्क किती आहे, या बाबत जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये देण्याची तरतूद या अर्थ बजेटमध्ये केली नाही आणि सरकार ने पुन्हा शेतकऱ्यास फसवल तर येत्या ५ एप्रिल ला स्वाभिमानाची कोल्हापुरात राज्य कार्यकारणी बैठक घेऊन राज्यभर जनआंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Last Updated : Mar 8, 2022, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.