ETV Bharat / city

एकरकमी एफआरपीसह ऊसाचा दर जाहीर; कागलच्या शाहू कारखाना ठरला राज्यात पहिला - Samajieet singh Ghatge

शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे पत्रकार परिषदेत म्हणाले, की यावर्षी महापुरासह अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आमच्या कारखान्याला हा चांगला दर देणे शक्य आहे. त्यामुळे यावर्षी 2 हजार 993 रुपये इतका दर आम्ही देणार आहोत.

एकरकमी एफआरपीसह ऊसाचा दर जाही
एकरकमी एफआरपीसह ऊसाचा दर जाही
author img

By

Published : Oct 12, 2021, 2:59 AM IST

Updated : Oct 12, 2021, 4:09 AM IST

कोल्हापूर - कागलमधील श्री शाहू छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा हंगाम सुरू होण्याआधीच एकरकमी एफआरपीसह ऊसाचा दरदेखील जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी हंगाम सुरू होण्याआधीच हा दर जाहीर केला आहे. यावर्षी महापुराने शेतकरी मोठ्या संकटात आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष घाटगे यांनी सांगितले आहे.

आमच्या कारखान्याला हा दर देणे शक्य-

शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे पत्रकार परिषदेत म्हणाले, की यावर्षी महापुरासह अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आमच्या कारखान्याला हा चांगला दर देणे शक्य आहे. त्यामुळे यावर्षी 2 हजार 993 रुपये इतका दर आम्ही देणार आहोत.

एकरकमी एफआरपीसह ऊसाचा दर जाहीर

हेही वाचा-भिवंडीत तीन गोदामांतून 'हुक्का' फ्लेवरचा 9 कोटी रुपयांचा साठा जप्त

मला राजकारणात पडायचे नाही, आम्हाला शेतकऱ्यांना दिला द्यायचा आहे -

दरवर्षी कोल्हापूरसह राज्यभरात उसाच्या दरासह एकरकमी एफआरपीसाठी मोठे आंदोलन होत असते. कारखानदारांसोबत अनेक बैठका होत असतात. त्यानंतर काय तो तोडगा निघत असतो. मात्र शाहू कारखान्याने 2 हजार 993 रुपये इतका दर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीने तुकडे पाडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबतच बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, की मला कोणत्याही राजकारणात पडायचे नाहीय. आमच्या कारखान्याला हा दर देणे शक्य आहे. शेतकरीसुद्धा महापुरामुळे अडचणीत आहे. त्यामुळे यावर्षी सर्वात प्रथम दर जाहीर करून त्यांच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा-उजनी धरणातून भीमा नदीपात्रात दुप्पट विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Last Updated : Oct 12, 2021, 4:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.