ETV Bharat / city

कोणत्याही उर्जेशिवाय सुर्याबरोबर फिरणार सोलार पॅनेल, कोल्हापूरातील विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट देशात अव्वल - मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन

सुर्याच्या किरणाबरोबर सोलार पॅनेल फिरवण्यासाठी विद्युत उर्जेची गरज ( Electricity required to rotate solar panels ) असते. मात्र कोल्हापूरातल्या डिकेटीई मधील विद्यार्थ्यांनी आधुनिक पध्दतीने डिझाईन केलेल्या प्रकल्पामध्ये कोणतीही उर्जा न वापरता सायफन टेक्नॉलॉजी ( siphon technology ) वेट बॅलन्सच्या आधारे सुर्य किरणांबरोबर सोलार पॅनेल फिरविता येते हे सिध्द केले आहे.

Solar panel
कोल्हापूरातील विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट
author img

By

Published : Sep 17, 2022, 2:27 PM IST

कोल्हापूर : पारंपारिक पध्दतीमध्ये सुर्याच्या किरणाबरोबर सोलार पॅनेल फिरवण्यासाठी विद्युत उर्जेची गरज ( Electricity required to rotate solar panels ) असते. मात्र कोल्हापूरातल्या डिकेटीई मधील विद्यार्थ्यांनी आधुनिक पध्दतीने डिझाईन केलेल्या प्रकल्पामध्ये कोणतीही उर्जा न वापरता सायफन टेक्नॉलॉजी ( siphon technology ) वेट बॅलन्सच्या आधारे सुर्य किरणांबरोबर सोलार पॅनेल फिरविता येते हे सिध्द केले आहे. त्यामुळे आता उर्जा बचत होण्यास मदत होणार आहे शिवाय पर्यायी सामान्य व्यक्तीला परवडेल अशा प्रकारचे सोलार पॅनेल बनवण्यामध्ये या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. काय आहे हा नेमका प्रोजेक्ट याबाबतचा ईटीव्ही भारतचा विशेष रिपार्ट...

सोलार पॅनेल

टीम अल्फा’ हा संघ देशामध्ये अव्वल : दरम्यान, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ( Ministry of Education, Government of India ) अंतर्गत असलेल्या ‘इनोव्हेशन कौन्सिल’ व एआयसीटीई, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने चेन्नई येथे आयोजित केलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२२’( Smart India Hackathon 2022 ) या स्पर्धेमध्ये इचलकरंजी येथील डीकेटीईचा ‘टीम अल्फा’ हा संघ देशामध्ये अव्वल ठरला. यामध्ये त्यांना एक लाख रुपयाचे बक्षिस देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

मोदी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन - देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झाले होते. ही देशातील सर्वात मोठी स्पर्धा होती. ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२२’ या स्पर्धेमध्ये देशभरातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन,( Ministry of Education ) भारत सरकार यांच्या मार्फत देण्यात आलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी आधुनिक संकल्पनेव्दारे त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देत समाजोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. भारतातून आलेल्या अर्जामधून एकूण १५० हून अधिक टीम्स यासाठी पात्र झाले होते. त्यानंतर प्रत्यक्षात चेन्नई येथे ग्रँड फायनल मध्ये निवडक उत्कृष्ट टीमची निवड झाली होती. ही स्पर्धा सॉफ्टवेअर व हार्डवेअर या दोन विभागामध्ये आयोजित करण्यात आली होती. हार्डवेअर विभागामध्ये तब्बल १२० तास ही स्पर्धा सुरु होती. त्यामध्ये बी.टेक. इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग मध्ये शिकत असलेले साबीर सजदे, प्रणव चौगुले, अभिषेक मोहिते, श्रध्दा पाटील, प्राजक्ता पवार व बी.टेक.मेकॅनिकल इंजिनिअरींग मधील प्रथमेश अरबळी या विद्यार्थ्यांच्या ‘टीम अल्फा’ ने घवघवीत यश मिळवत भारतातून प्रथम येण्याचा मान पटकावला. सदर विद्यार्थ्यांना डीकेटीईतील इलेक्ट्रीकल विभागाचे प्रमुख व डीन डॉ.आर.एन. पाटील व प्रा. ए.ए. मालगावे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

काय आहे या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट ? : या विद्यार्थ्यांनी ‘सोलार पॅनेल विथ सोलार ट्रॅकींग डिव्हाईस विदाउट पॉवर कन्झंम्शन’ या विषयावर परीक्षकांच्या देखरेखीखाली प्रकल्पाची मांडणी केली. पारंपारिक पध्दतीमध्ये सुर्याच्या किरणाबरोबर सोलार पॅनेल फिरवण्यासाठी विद्युत उर्जेची गरज असते. विद्यार्थ्यांनी आधुनिक पध्दतीने डिझाईन केलेल्या प्रकल्पामध्ये कोणतीही उर्जा न वापरता सायफन टेक्नॉलॉजी व वेट बॅलन्सच्या आधारे सुर्य किरणांबरोबर सोलार पॅनेल फिरविता येते हे सिध्द केले. सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर सुर्यास्तापासून सुर्योदयापर्यंत सोलर पॅनेल सुर्याबरोबर सूर्यकिरणे मिळविण्यासाठी विशिष्ट ऊर्जा देऊन फिरवले जातात. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. त्याच विजेची मोठी बचत या प्रोजेक्टमुळे होणार आहे. कारण यामध्ये उर्जा बचत तर झालीच आहे शिवाय पर्यायी सामान्य व्यक्तीला परवडेल अशा प्रकारचे सोलार पॅनेल बनवण्यामध्ये या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी डिझाईन पेटेंट देखील मंजूर झाले आहे. या सर्वांची केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांनी देखील दखल घेतली आणि गौरवोद्गार काढले. अशा प्रकारे देशातील सहभागी झालेल्या सर्व टीम्स मध्ये डीकेटीईची टीम अल्फा अव्वल ठरली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.