ETV Bharat / city

कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाला शिवसेनेचे चोख प्रत्युत्तर; कर्नाटकची बस वाहतूक रोखली

कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाला शिवसेनेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापुरातील कर्नाटकची बस वाहतूक शिवसेनेने रोखली आहे.

author img

By

Published : Mar 12, 2021, 7:28 PM IST

Updated : Mar 12, 2021, 7:56 PM IST

Shiv Sena also responded to the agitation of Kannada Rakshan Vedike
कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाला शिवसेनेने सुद्धा चोख प्रत्युत्तर; कर्नाटकची बस वाहतूक रोखली

कोल्हापूर : कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाला आता शिवसेनेने सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले आहे. कन्नड संघटनेविरोधात आता शिवसेना आक्रमक झाली असून कर्नाटक राज्याची बससेवाच शिवसेनेने बंद केली आहे. कोल्हापूर येथील बसस्थानकावर शिवसेनेने हे आंदोलन केले असून कर्नाटकच्या काही बसला काळेही फासण्यात आले आहे. बेळगावमध्ये मराठी फलकांना काळे फासल्यानंतर तसेच कन्नडिगांची सुरू असलेल्या मुजोरीच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - बेळगावात शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नडिगांचा हल्ला, घटनास्थळी तणाव

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या गाडीवर व रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला -

आज दुपारी बेळगाव मधील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या गाडीवर व रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. बेळगाव शहरातील सम्राट अशोक चौक परिसरात ही घडली. शिवाय शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान या घटनेनंतर आता कोल्हापूरातील शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाले असून त्यांनी कर्नाटकमधील बस वाहतुकच थांबवली आहे.

हेही वाचा - गोकुळ निवडणूक लवकरच, महाविकास आघाडी मिळून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न - हसन मुश्रीफ

Last Updated : Mar 12, 2021, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.