ETV Bharat / city

Reactions of Celebrity : महाराष्ट्राचा आवाज हरपला; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली - CM Uddhav Thackeray about N.D. Patil

Senior Leader N.D. Patil passes away
मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
author img

By

Published : Jan 17, 2022, 4:01 PM IST

Updated : Jan 17, 2022, 5:47 PM IST

17:28 January 17

कोल्हापूरमधून प्रतिनिधीने घेतलेला आढावा

कोल्हापूरमधून प्रतिनिधीने घेतलेला आढावा

कोल्हापूर - शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 3 दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी सदैव संघर्ष करत राहिलेले एक वादळ शांत झालं अशा प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटू लागल्या आहेत. याच रुग्णालयाबाहेरून कार्यकर्ते आणि एन. पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते बाबासाहेब देवकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सीमा पाटील, बाबूराव कदम यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..

16:53 January 17

महाराष्ट्राचे मोठे नुकसान जे कधीही भरून निघणार नाही - बावनकुळे

नागपूर - शेकापचे नेते एन. डी पाटील यांच्या निधनाने मोठे नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. त्यांनी आपले आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केले होते. त्यांचा त्याग महाराष्ट्र विसरू शकणार नाही. ऊर्जा विभागात मंत्री असतांना अनेक वेळा ते मंत्रालयात येत होते. शेतकऱ्याच्या विजेच्या प्रश्नांना घेऊनते पाठपुरावा करत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन लढत होते. हे नुकसान भरून न निघणारे असून त्यांना श्रद्धांजली माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

16:28 January 17

तत्वनिष्ठ, निस्वार्थी आणि जनतेशी बांधिलकी असणारा नेता हरपला!

एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

मुंबई - शेतकऱ्यांच्या प्रती आस्था ठेवणारा, शेवटपर्यंत जनहिताशी बांधिलकी ठेवणारा.. तत्वनिष्ठ आणि निस्वार्थी नेता आज हरपला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन डी पाटील यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एन डी पाटील यांनी वेळोवेळी विधिमंडळातही जनतेचे प्रश्नाबाबत आवाज उठवला. अभ्यासपूर्ण भाषणाच्या जोरावर त्यांनी सभागृह गाजवली असल्याची आठवणही शरद पवार यांनी केली. शेतकरी कामगार पक्षाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्याच बरोबर त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी त्यांनी त्यात क्षमतेने निभावली. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत त्यांचे योगदान विसरले जाणार नाही. सर्व कुटुंबीयाप्रती या दुःखद प्रसंगी शांतवन व्यक्त करताना शरद पवार यांनी एन डी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

16:21 January 17

ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व - जयंत पाटील

एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. अशी भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

16:03 January 17

उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्व हरपले - अजित पवार

“महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील साहेब निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केले. आमदार म्हणून काम केले. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील साहेब हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचे निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

16:02 January 17

तरुणांनी त्यांचा वारसा पुढे चालवला - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

मुंबई - सर्वसामान्यांसाठी लढणारे आणि समाजातले मोठमोठ्या विषयाला वाचा फोडणारे नेतृत्व आज हरपले. त्यांच्या जाण्याची पोकळी भरून निघणे कठीण आहे. तरुणांनी त्यांचा वारसा पुढे चालवला पाहिजे अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एन डी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. शेतकऱ्यांच्या वीजबिलात शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचं सरकारसमोर एन डी पाटील यांनी समोर आणून आणून दिले. त्यानंतर तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे दोन निर्णय घेतले. असे लोकांचे प्रश्न समोर आणणारे नेते म्हणजे एन. डी. पाटील होते अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

16:01 January 17

सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले - मंत्री हसन मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर - प्राध्यापक एन. डी. पाटील यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी कधीही आपल्या तत्त्वाशी तडजोड केली नाही. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहिले. सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या नेत्यांची अनेक उदाहरण आहेत. मात्र आयुष्यभर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहून कोणत्याही ऑफरला बळी न पडता सर्वसामान्यांचा आवाज बनून राहिले. अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. निधनाची बातमी समजताच येथील रुग्णालयात येऊन पुष्पहार अर्पण करून एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

14:33 January 17

महाराष्ट्राचा आवाज हरपला

मुंबई - शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी 'ब्र' काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने 'एन. डी.' उभे राहिलेच म्हणून समजा असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला.

Last Updated : Jan 17, 2022, 5:47 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.