ETV Bharat / city

वृक्ष संवर्धनाबाबत सयाजी शिंदेंनी सुचवला अनोखा उपक्रम; जुन्या झाडांना मिळावा सेलिब्रिटी दर्जा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत अभिनेते सयाजी शिंदे यांची बैठक झाली. याची माहिती देताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात सुद्धा वृक्षसांवर्धनासाठी तसेच मुलांना शाळेत असल्यापासूनच झाडांचं महत्व समजावे यासाठी अनेक उपाययोजना करू शकतो...

author img

By

Published : Mar 17, 2021, 1:40 AM IST

Sayaji Shinde meets Deputy CM Ajit Pawar and Minister Hassan Mushrif on conservation of trees
वृक्ष संवर्धनाबाबत सयाजी शिंदेंनी सुचवला अनोखा उपक्रम; जुन्या झाडांना मिळावा सेलिब्रिटी दर्जा

कोल्हापूर : हरियाणा सरकारने 70 वर्षे पूर्ण झालेल्या झाडांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. याचे कौतुक करत महाराष्ट्रात सुद्धा वृक्षांच्या संवर्धनासाठी अशाच पद्धतीने काही योजना राबविल्या पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते आणि वृक्षसंवर्धनाची मोठी चळवळ उभी केलेले सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये सुद्धा याबाबत नुकतीच एक बैठक सुद्धा पार पडली असल्याची त्यांनी माहिती दिली.

टॉप १०० सेलिब्रिटी झाडं..

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत अभिनेते सयाजी शिंदे यांची बैठक झाली. याची माहिती देताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात सुद्धा वृक्षसांवर्धनासाठी तसेच मुलांना शाळेत असल्यापासूनच झाडांचं महत्व समजावे यासाठी अनेक उपाययोजना करू शकतो. खरंतर आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत झाडांचं आपल्या जीवनात खूप महत्व आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देण्यापासून झाडांचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच जुन्या झाडांना खऱ्या अर्थाने सेलिब्रिटीचा दर्जा दिला गेला पाहिजे असे शिंदे यांनी म्हटले.

शैक्षणिक सहलीचे आयोजन..

महाराष्ट्रातील सर्वात जुनी झाडं शोधून त्या झाडांना सेलिब्रिटीचा दर्जा द्यायला हवा. यासाठी सर्वात पहिला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील 10 आणि त्यामधून सर्व महाराष्ट्रातील टॉप 100 सेलिब्रिटी झाडं निवडायची. त्या झाडांच्या ठिकाणी शाळेतील मुलांची सहल आयोजित करून मुलांना त्या झाडांचं महत्व सांगायला हवं. असे केल्यास लहानपणापासून मुलांना वृक्ष संवर्धनाची गोडी लागेल असेही शिंदे यांनी म्हटले. त्याला आता कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार असून, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्वात जुनी 100 झाडेसुद्धा सर्वांना समजतील.

हेही वाचा : मद्यधुंद महिलेचा महामार्गावरच धिंगाणा.. पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.