ETV Bharat / city

Sanjay Raut on Shahu Maharaj Statement : भाजपने निर्माण केलेला संभ्रम शाहू महाराजांच्या विधानाने दूर झाला - संजय राऊत

शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी आपली भूमिका व्यक्त करत शिवसेनेची पाठराखण केली आहे. तसेच संभाजीराजे यांची कानउघाडणी देखील केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे यांच्या विरोधात भाजपने (BJP) जो संभ्रम निर्माण केला होता तो शाहू महाराजांच्या विधानाने (Sanjay Raut on Shahu Maharaj Statement) दूर झाला, असे संजय राऊत म्हणाले.

sanjay raut
संजय राऊत
author img

By

Published : May 28, 2022, 7:04 PM IST

Updated : May 28, 2022, 7:16 PM IST

कोल्हापूर - संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी काल (27 मे) पत्रकार परिषदेत शिवसेनेवर (Shivsena) नाराजी दाखवत खंत व्यक्त केली होती. त्यावर आज त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी आपली भूमिका व्यक्त करत शिवसेनेची पाठराखण केली आहे. तसेच संभाजीराजे यांची कानउघाडणी देखील केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे यांच्या विरोधात भाजपने (BJP) जो संभ्रम निर्माण केला होता तो शाहू महाराजांच्या विधानाने (Sanjay Raut on Shahu Maharaj Statement) दूर झाला. शिवसेनेने कोणाची फसवणूक केली नाही, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली, असे विधान राऊत यांनी केले आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - Sambhaji Raje : संभाजीराजे छत्रपती यांचे राजकारण आणि घराण्याचा राजकीय इतिहास

शाहू महाराजांचा आशीर्वाद घेणार - शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या मातीत सत्य आणि प्रामाणिकपणाची कास अद्यापही सोडली नाही. शाहू महाराजांच्या विचारांसमोर महाराष्ट्र आजही झुकतो. त्यांच्या वंशजांनी सत्याची कास अद्यापी सोडली नाही. मी शाहू महाराज छत्रपती यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेणार असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच संभाजीराजे यांच्या विरोधात भाजपने जो संभ्रम निर्माण केला, तो शाहू महाराजांच्या विधानाने दूर झाला. शिवसेनेने कोणाची फसवणूक केली नाही, तर देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली, असे विधान राऊत यांनी केले. तसेच देवेंद्र फडणवीसांचे विधान खोटे होते हे शाहू महाराज यांच्या विधानाने स्पष्ट झाले आहे. शेवटी शाहू महाराजांचा अनुभव हा दांडगा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना छत्रपती शाहू महाराजांचा निकटचा स्नेह मिळाला असून, शिवसेनेने खालच्या पातळीचे राजकारण कधी केले नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

काय म्हणाले होते शाहू महाराज - खासदारकीची टर्म संपल्यानंतर संभाजीराजे फडणवीस (Sambhaji Raje Meet Fadnavis) यांच्याकडे गेले. अर्धा तास होते त्यात काही बोलणे झाले माहिती नाही. पण काहीतरी बोलले असतील. पण तिथून बाहेर पडल्यावर लगेच त्यांनी पक्षाची घोषणा केली आणि अपक्ष राहणार म्हणून जाहीर केले. पाठिंबा पाहिजे होता तर इतर नेत्यांकडेसुद्धा जाणे गरजेचे होते. तसा प्रयत्न केला पाहिजे होता. राज्यसभेसाठी गणित जुळवून न आणता पक्ष घोषित करणे हा निर्णय चुकला. ज्यांच्याकडे मतं जास्त आहेत त्यांच्याकडे ते अप्रोच झाले नाहीत, असे भाष्य संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shrimant Shahu Chhatrapati Maharaj) यांनी केले आहे. शिवाय एक ड्राफ्ट झाला होता. मात्र, तेच पुढे फायनल झाले असते आणि मग विचार बदलला असता तर मग यू टर्न मारला म्हणता आले असते, असेही ते म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते. त्यांचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

हेही वाचा - Shahu Chhatrapati : संभाजीराजेंना पाठिंबा पाहिजे होता तर फडणवीसांकडे गेले तसे इतर नेत्यांकडेसुद्धा जाणे गरजेचे होते - शाहू छत्रपती

Last Updated : May 28, 2022, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.