मुंबई - आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. ज्यांनी संभाजी राजे ( Sanjay Raut criticize BJP over Sambhaji Raje ) यांना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्रयत्न फसला आहे, अशी टीका भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत ( Sanjay Raut criticize BJP ) यांनी केली. तसेच, शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही, असा टोलाही ( Sanjay Raut news kolhapur ) त्यांनी लगावला.
भाजपची उडी फसली - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि सध्याच्या शाहू महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक नाते आहे. काल त्यांनी घेतलेली भूमिका पाहून कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही प्रामाणिकपणा आणि शाहू घराण्याची परंपरा कायम असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच, शाहू महाराजांना अभिवादन करणे कर्तव्य आहे, असे संजय राऊत म्हणाले. तर, संभाजी राजे यांनी केलेल्या ट्विटबाबत बोलताना, आम्हाला छत्रपती शाहू महाराजांविषयी जो आदर आहे तोच संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आहे. आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. ज्यांनी संभाजी राजे यांना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची उडी फसली आहे. त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला पण ते पडले, अशी टीका भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी केली. तसेच, शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
यापुढे बेळगावमध्ये शिवसेना ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर निवडणूक लढवणार नसून शिवसेना बेळगावातील सर्व निवडणुका स्वतः लढवेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकजूट नसल्याने ती फुटत आहे आणि याचा फटका बेळगावलाच नाही तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यालाही बसत आहे. यामुळे आम्ही स्वतः आता तेथे उतरणार असल्याचे संजय राऊत यांनी आज जाहीर केले. काल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या बैठकीची कानउघडणी केली.
हेही वाचा - Kirit Somaiya on anil parab : अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, किरीट सोमैया यांची मागणी
आज सकाळी श्रीमंत शाहू महाराज ( Sanjay Raut Shahu Maharaj ) यांची भेट घेणार असून, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीमंत शाहू महाराजांचे जिव्हाळ्याचे नाते आहेत. श्रीमंत शाहू महाराज यांनी देशासाठी आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी शाहू महाराजांचे कौतुक केले.
काल मुंबईमध्ये झालेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावर टीका करत, शरद पवार हे संजय राऊत यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांना भेटले, मात्र नवाब मलिक यांच्यासाठी भेटले नाहीत, असे म्हटले होते. यावर असदुद्दीन ओवैसी है औरंगजेबाचा विषय सोडून तिकडे कुठे जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी अनेक विषय असतात, त्यात माझा एक विषय असेल, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा - त्या 269 शाळेतील मुलांचे भविष्य सुरक्षित करा, आमदार नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना आवाहन