कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळावरुन कार्गो वाहतूक सेवेसाठी (मालवाहतूक) भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) ने मान्यता दिली आहे. या नवीन सेवेमुळे आता जिल्ह्यातील शेती, शेतीपूरक व्यवसाय, स्थानिक उद्योग आणि व्यवसाय वाढीला चालना मिळणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
-
We are pleased to inform you that #Kolhapur Airport has successfully obtained permission from BCAS (@BcasHq) for Belly Cargo. This enhances value for the Agriculture & industries in Kolhapur by driving a safe, secure, profitable & sustainable supply chain. pic.twitter.com/h9eMS56L6R
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) January 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We are pleased to inform you that #Kolhapur Airport has successfully obtained permission from BCAS (@BcasHq) for Belly Cargo. This enhances value for the Agriculture & industries in Kolhapur by driving a safe, secure, profitable & sustainable supply chain. pic.twitter.com/h9eMS56L6R
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) January 10, 2022We are pleased to inform you that #Kolhapur Airport has successfully obtained permission from BCAS (@BcasHq) for Belly Cargo. This enhances value for the Agriculture & industries in Kolhapur by driving a safe, secure, profitable & sustainable supply chain. pic.twitter.com/h9eMS56L6R
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) January 10, 2022
शेतमाल, उद्योगांच्या हवाई वाहतुकीसाठी या सेवेचा मोठा फायदा होणार - सतेज पाटील
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर विमानतळाहून कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. त्याचबरोबर स्थानिक उद्योगांना, शेती व शेतीपूरक उत्पादनाला उत्तेजन मिळेल. कृषी उत्पादन, औद्योगिक, दुग्धोपादन आणि वैद्यकीय क्षेत्रातून या कार्गो सेवेची मागणी होत होती. विमानतळावर कार्गो सेवेला मंजुरी मिळाल्यामुळे कोल्हापूरसह आजूबाजूच्या परिसरातील शेतमाल, उद्योगांच्या हवाई वाहतुकीसाठी या सेवेचा मोठा फायदा होईल. येथील स्थानिक उत्पादन अन्य राज्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळाहून परदेशी बाजारपेठेत जाऊन जिल्ह्याचा विकास साधला जाईल. येथील स्थानिक उद्योगांचे मुल्य वाढेल. विमानतळाची कार्गो सेवा जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक स्वरुपावर सकारात्मक दीर्घकालीन परिणाम निर्माण करेल.
पालकमंत्र्यांकडून विमानतळ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन -
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर विमानतळ येथे अत्याधुनिक सोयी सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर विमानतळ हे जागतिक दर्जाचे विमानतळ कसे बनेल यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले असून सर्वांचे अभिनंदन केले आहे.