ETV Bharat / city

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत; आठवलेंची चंद्रकांत पाटलांसोबत चर्चा - kolhapur marathi news

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत आरपीआय भाजपा सोबत राहणार आहे. आरपीआयची ताकत पाहून जागा द्या, अशी मागणी आठवले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

चंद्रकांत पाटील आणि रामदास आठवले
चंद्रकांत पाटील आणि रामदास आठवले
author img

By

Published : Dec 9, 2020, 3:31 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. एकूणच विधान परिषदेमध्ये भाजपला मिळालेलं अपयश आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासोबत चर्चा केल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत राहणार-

विधान परिषदेमध्ये भाजपला मोठ अपयश मिळाले. गेले अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या पुणे पदवीधर मतदार संघाची जागा देखील भाजपला गमवावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आपण चर्चा केल्याची माहिती रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली. महाराष्ट्रातील आगामी महापालिकेच्या निवडणुकासंदर्भातही चर्चा झाली. या निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत राहणार असल्याचा विश्वासही आपण चंद्रकांत पाटील यांना दिल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.

संख्याबळ आणि ताकद पाहून महापालिकेच्या निवडणुकीत जागा द्याव्यात-

आमचे संख्याबळ आणि ताकद पाहून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा द्याव्यात, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आरपीआयचे संख्याबळ आहे. त्याठिकाणी उप-महापौर पद देण्याचा आग्रह आमचा राहणार आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा १८ डिसेंबरला मुंबईत येत असून या संदर्भात आपण त्यांच्यासोबतही चर्चा करणार असल्याचे आठवले म्हणाले.

हेही वाचा- दिनविशेष : आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस; विकासाच्या मार्गातील अडथळा कधी संपणार?

हेही वाचा- राज्यातील शाळांमध्ये सहा हजार शिक्षकांची होणार भरती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.